Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईतील जीममध्ये केबलवरून 'फ्री स्टाईल', व्हिडीओ Viral

गोरेगाव पूर्वेतील यूमेनिया फिटनेस जीममध्ये 25 मार्च रोजी तीन जणांनी 25 वर्षीय तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

मुंबईतील जीममध्ये केबलवरून 'फ्री स्टाईल', व्हिडीओ Viral

Mumbai Crime News : मुंबईतील गोरेगाव पूर्वेतील यूमेनिया फिटनेस जीममध्ये ट्राइसेप्ससाठी व्यायामाच्या उपकरणांवरून जीममध्ये मोठा वाद झाला.  ज्यामध्ये या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. ज्यामध्ये 25 वर्षीय तरुणाला जीममधील 3 जणांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तो तरुण गंभीर जखमी झाला. ज्याला मारहाण झाली या तरुणाचे नाव गौरव मिश्रा आहे. तो एक आर्किटेक्ट आहे. जीममधील मारहाणीनंतर वनराई पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ज्यामध्ये राज मुथ्थु, लव्ह शिंदे आणि कार्तिक अमीन अशी आरोपींची नावे आहेत. 

गोरेगावमधील या घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, गौरव मिश्रा हा जीममध्ये व्यायाम करण्यासाठी आला होता. तो तिथे ट्रायसेप्स मारत असताना तिथेच मुथ्थू देखील व्यायाम करत होता. ट्रायसेप्स मशीनजवळील बेंचवर झोपलेल्या मुथ्थूने गौरवला तिथे असणारी देण्यास सांगितले. मात्र, दोरी देण्यास गौरव मिश्राने नकार दिला. त्यानंतर मुथ्थूला प्रचंड राग आला आणि त्याने गौरव मिश्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 

या वादाचे रुपांतर थेट हिंसाचारात झाले. त्यानंतर त्याने गौरव मिश्राला मारहाण केली. ही मारहाण सुरु असतानाच यामध्ये मुथ्थूचे दोन मित्र लव शिंदे आणि कार्तिक अमीन हे पडले. तिघांनीही गौरव मिश्राला मारहाण केली. यामध्ये चिडलेल्या मुथ्थूने थेट गौरव मिश्राच्या डोक्यावर रॉडने वार केले. ज्यामध्ये गौरव गंभीर जखमी झाला. 25 वर्षीय जिम ट्रेनरने यामध्ये हस्तक्षेप करत मिश्राला वाचवले.  त्यानंतर गौरवला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्याच्या डोक्याला अनेक टाके पडले आहेत. 

ओळखपत्र न पडताळता जीममध्ये प्रवेश? 

या संपूर्ण घटनेनंतर गौरव मिश्राने त्याच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांनी वापरलेला रॉड शोधून तो पोलिसांना दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा पोलिसांनी गौरव मिश्राला विचारले की त्या तिन्ही व्यक्तींची नावे काय आहेत. त्यावर मिश्राने कोणतीही माहिती उपलब्ध नाही असे सांगितले. याचा अर्थ असा आहे की जीममध्ये कोणत्याही ओळखपत्रांची पडताळणी न करता प्रवेश दिला जातो असं मिश्राने सांगितले. 

मात्र, त्याच वेळी गौरवची तब्येत बिघडू लागली. त्याला चक्कर येऊ लागली. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.  याव्यतिरिक्त एफआयआरमध्ये लागू करावयाच्या सर्व कलमांचा समावेश नाही. त्यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा कलम लावला पाहिजे असे मिश्राने सांगितले. त्यानंतर वनराई पोलिस स्टेशनमध्ये बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. आम्ही आरोपींना समन्स बजावले असून त्यांना नोटीस बजावली असं वरिष्ठ निरीक्षक राजू माने यांनी सांगितले. 

Read More