Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक बातमी समोर येतेय. एका आईनेच आपल्या सहा महिन्याच्या चिमुरड्याची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गोंवडीतील ही घटना असून या घटनेने एकच हळहळ व्यक्त करण्यात येतेय. आरोपी महिलेचे नाव सुलताना अब्दुल खान असं असून चिमुरड्याच्या हत्येनंतर महिला स्वतःच पोलिस ठाण्यात गेली आणि कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही दुर्धर आजाराने ग्रासली होती. त्या नैराश्यातूनच तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून या महिलेस अटक केली आहे.
सुलताना ही चेंबूरच्या पी.एल.लोखंडे मार्ग येथील गारमेंटमध्ये मजुरी करते. अलीकडेच सुलतानाला एचआयव्हीची लागण झाल्याचे समजले होते. आपल्यामुळं बाळालाही लागण झाली असावी, असा तिला संशय होता. त्यामुळं आर्थिक विवंचनेतून तिने बाळाची हत्या केली. पण प्रत्यक्षात बाळाला लागण झालीच नव्हती, असे समोर आले.
आरोपी महिलेने एकदा नव्हे तर तीनदा लग्न केले होते. मात्र तिचा एकही संसार टिकला नाही. त्यानंतर एका व्यक्तीसोबत तिचे प्रेमसंबंध होते. मात्र ती गर्भवती राहिल्यानंतर तो प्रियकरदेखील पळून गेला होता. त्यामुळं ती नैराश्यात गेली. सहा महिन्यांपूर्वी तिने बाळाला जन्म दिला होता. पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आणि वैद्यकीय खर्च वाढल्याने ती मानसिकदृष्ट्या खचली होती आणि त्यातूनच तिने हे कृत्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, 6 महिन्याच्या बाळाची झोपाळ्यातच उशीने तोंड दाबून हत्या केली.
बाळाची हत्या केल्यानंतर सुलताना गारमेंटमध्ये गेली. तिथे तिने एका महिलेवर हल्ला केला. टिळकनगर पोलिसांनी तिची चौकशी केली असता हा प्रकार कळला. टिळक नगर पोलिसांनी शिवाजीनगर पोलिसांनी ही माहिती दिली. शिवाजीनगर पोलिस तिच्या घरी पोहोचले असत बाळ पाळण्यात बेशुद्धावस्थेत आढळले होते.
दरम्यान, महिला ठार करुन महिला स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर तिने स्वतःला दुखापत न करता फक्त बाळाचा जीव घेतल्याची कबुली पोलिसांना दिली.