Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Dating App वर ओळख, मुंबईतील महिला डॉक्टरचा छळ आणि जबरदस्तीने गर्भपात, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

डेटींग अॅपवरून महिला डॉक्टरचा छळ करत बळजबरीने गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. 

Dating App वर ओळख, मुंबईतील महिला डॉक्टरचा छळ आणि जबरदस्तीने गर्भपात, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

Mumbai Crime : मुंबईत 28 वर्षीय महिला डॉक्टरचा डेटींग अॅवरून लैंगिळ छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामधील आरोपीने महिला डॉक्टरला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यासोबतच तिचे खासगी फोटो देखील सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी डेटींग अॅपवर भेटलेल्या आरोपीने दिली. यामुळे महिला डॉक्टरने हे सर्व सहन न झाल्यामुळे थेट पोलिसांकडे धाव घेतली. या महिला डॉक्टरने एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या मिळालेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. 

गुन्हा दाखल केलेल्या महिला 28 वर्षांची असून ती मुंबईमधील अंधेरी येथील प्रसिद्ध रुग्णालयात कार्यरत आहे. तिचे मूळची कोकणातील आहे. मात्र, शिक्षण आणि नोकरीसाठी ती मुंबईत आली होती. ती मुंबईत एकटी राहत होती. त्यामुळे तिने 2023 मध्ये मैत्री करण्यासाठी हिंगे नावाच्या डेटींग अॅपवर आपले नाव नोंदवले. त्यानंतर अशातच तिची ओळख मुंबईमधील एका मुलाशी झाली. हा मुलगा 27 वर्षांचा आहे. तो मुंबईतील डोंगरी भागात राहतो. त्याचे नाव खालिद खानयारी असून तो काश्मिरी शॉल विक्रीचा व्यवसाय करतो. 

महिला डॉक्टरचा छळ आणि जबरदस्तीने गर्भपात

दरम्यान, याच डेटिंग अॅपवर दोघांची मैत्री झाली. अनेक दिवस एकमेकांशी बोलल्या नंतर 22 ऑक्टोबर 2023 रोजी आरोपी खालिद खानयारीने तिला भेटण्यासाठी नवी मुंबईतील घरी आला. यावेळी दोघांनी देखील परस्पर संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर ते अनेकदा एकमेकांना भेटत राहिले. दोघांमध्ये नेहमी प्रमाणे शरीरसंबंध प्रस्थापित होत होते. नेहमी भेटत असल्यामुळे आरोपीने तिचे काही खासगी फोटो काढून ठेवले. काही दिवसांनंतर महिला डॉक्टरला आपण गर्भवती असल्याचे समजले.

खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी

मात्र, ही गोष्ट महिलेने खालिदला सांगितल्या नंतर खालिदने बळजबरीने महिला डॉक्टरला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. गर्भपात आणि गोळ्यांमुळे तिची तब्येत बिघडली. त्यानंतर आरोपी या महिलेला भेटणे टाळू लागला. काही दिवसांनंतर महिला त्याच्या घरी गेली असता त्याचा साखरपुडा झाल्याचं तिला समजलं. यानंतर महिला डॉक्टरने खालिदला जाब विचारला. त्यावर खालिद म्हणाला की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही आणि मी तुला कधीच लग्नाचे आश्वासन दिले नाही. त्यामुळे काही केल्यास दोघांची काढलेले खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर हा राग सहन न झाल्यामुळे महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीवर कलम 351(2) आणि 89 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

Read More