Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत फेरीवाल्याने लपवला गटारीत भाजीपाला

वाकोला परिसरात फेरीवाल्यांनी आपला माल लपवून ठेवण्याची नवी शक्कल लढवलीय.

मुंबईत फेरीवाल्याने लपवला गटारीत भाजीपाला

मुंबई : वाकोला परिसरात फेरीवाल्यांनी आपला माल लपवून ठेवण्याची नवी शक्कल लढवलीय. रस्त्याशेजारच्या गटारामध्ये फळे, भाजीपाला ठेवला जात असल्याचे समोर आलंय. 

बॉक्स बाहेर काढतानाचा हा व्हिडिओ

गटाराची झाकणे काढून त्यातून फळे, भाज्यांचे बॉक्स बाहेर काढतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय. केवळ एकच फेरीवाला नव्हे तर रांगेने सर्वच फेरीवाले अशा प्रकारे गटारात माल ठेवत असल्याचं दिसतंय. कारण प्रत्येक गटाराच्या झाकणाजवळून माल बाहेर काढला जात आहे.

बीएमसी गाड्यांपासून माल वाचवण्यासाठी

यामुळं मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. रेल्वे परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्यानं बीएमसी गाड्यांपासून आपला माल वाचवण्यासाठी अशाप्रकारे लपवून ठेवला जातो.

Read More