Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

चोरीला गेलेला आयफोन पोलिसांनी केला परत, खार पोलिसांची कामगिरी

 दोघा दुचाकी स्वारांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्याचा आयफोन हातातून हिकावून घेतला आणि तेथून दुचाकीवरुन पलायन केले. मात्र, खार पोलिसांनी चोरीला गेलेला फोन परत मिळवून दिला आहे.  

चोरीला गेलेला आयफोन पोलिसांनी केला परत, खार पोलिसांची कामगिरी

मुंबई : लिंकरोड येथे सकाळी 6.30 वाजता दोघा दुचाकी स्वारांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्याचा आयफोन हातातून हिकावून घेतला आणि तेथून दुचाकीवरुन पलायन केले. मात्र, खार पोलिसांनी चोरीला गेलेला फोन परत मिळवून दिला आहे. सकाळी कोणी नसल्याचा  पायदा घेत चोरट्यांनी मोबाईल दुचाकीच्या माध्यमातून हिसकावून घेतला आणि काही क्षणात ते पसार झालेत. याबाबत संबंधितांने पोलिसात तक्रार केली. खार पोलिसांनी काही काळजी करु नका, आपला मोबाईल मिळेल, असे सांगून त्यांना आश्वासित केले. दोन दिवसांनी संबंधित चोरट्यांचा छडा लावत चोरी गेलेला मोबाईल परत मिळवला. (Mumbai : Khar Police Returned theft iphone)

fallbacks

मोबाईल फोन चोरीला गेल्यानंतर खार (पश्चिम) पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस काँस्टेबल योगेश तोरणे आणि पीएसआय सचिन त्रिमुखे यांनी तपासच्या दिशेने काम सुरु केले. माय आयफोन फीचर्सच्या माध्यमातून त्यांनी लोकशन ट्रॅकिंग केले आणि ठिकाणाचा शोध केला. आयफोनच्या लोकेशनुसार मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अंधेरी पूर्व येथे शोध सुरु केला. त्यानुसार दुचाकीवरुन आलेल्या दोघांची माहिती मिळाली. या ठिकाणी ते राहत असल्याचे समजले. त्यानंतर त्यांची अधिक माहिती जाणून घेत असताना पोलिसांनी ते तेथून पसार झाल्याचे समजले. त्यांच्यावर दोन दिवस पाळत ठेवून फोन चोरी करणाऱ्यांना पकडले आणि त्यांच्याकडून आयफोन जप्त केला.

चोरी गेलेला मोबाईल फोन दिवसात पोलिसांनी परत मिळवून दिला. पोलिसांनी समयसूचकता दाखवून चांगली कामगिरी करत चोरट्यांनाही ताब्यात घेतले. पोलीस काँस्टेबल योगेश तोरणे आणि पीएसआय सचिन त्रिमुखे यांच्या कामाबाबत कौतुक करण्यात येत आहे. 

Read More