Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

2 लोकल एकमेकांजवळून जाताना दाराजवळचे प्रवासी...; मुंब्र्यात नेमकं काय घडलं? रेल्वेनेचं सांगितलं

Mumbai Local Train Accident: अप आणि डाउन लोकल मधील प्रवाशांची एकमेकांना धडक दिल्यामुळं हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे. 

2 लोकल एकमेकांजवळून जाताना दाराजवळचे प्रवासी...; मुंब्र्यात नेमकं काय घडलं? रेल्वेनेचं सांगितलं

Mumbai Local Train Accident Latest Update:  मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या लोकलमधून 8 प्रवासी पडल्याची माहिती समोर येत आहे. या 8 ही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला आहे याची माहिती समोर आली नाहीये. प्रवासी ट्रॅकवर पडल्याचे फोटो आणि व्हिडिओदेखील समोर आले आहेत. सोमवारी सकाळीच 9.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा आणि दिवा या स्थानकादरम्यानच ही घटना घडली आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. 

नेमकं काय घडलं?

सोमवारी सकाळच्या सुमारास जेव्हा घटना घडली तेव्हा नेमकं काय झालं? घटना कशी घडली याबाबत संभ्रम होता. मध्य रेल्वेने पत्रकार परिषद घेत अपघाताचं कारण स्पष्ट केले आहे. लोकलमध्ये काही लोक फूटबोर्डवरून प्रवास करत होते. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांचा धक्का आपापसात लागल्याने 8 जण खाली कोसळले. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कसारा दरम्यान धावणाऱ्या दोन ट्रेन बाजूने जात असताना ही दुर्घटना घडली. 

सकाळी 9.30 च्या सुमारास एक ट्रेन सीएसएमटीला जात होती तर एक ट्रेन कसारा येथे जात होती. त्याच वेळी मुंब्रा ते दिवा या दोन स्थानकांच्या दरम्यान दोन लोकल बाजूने जात असताना फूटबोर्टवर उभे असलेल्या प्रवाशांच्या बॅगादेखील एकमेकांना घासल्या गेल्याने ते खाली कोसळले. साधारण 8 जण लोकलमधून खाली पडले आहेत. 

दुर्घटनेची माहिती सीएसएमटीच्या गार्डकडून घेण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच, 9.50 वाजता रेल्वेकडून रुग्णवाहिका पुरवण्यात आली तसंच, त्यांना कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Read More