Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत फटका गँगमधील सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश

अंधेरी रेल्वे स्थानकात फटका गँगमधील सराईत गुन्हेगाराला पकडले.

मुंबईत फटका गँगमधील सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश

मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकावरील आरपीएफ जवानांना फटका गँगमधील सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश आले आहे. गुन्हेगाराला पडकण्यात आल्याची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहे. 

पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांवर गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट झालाय. लोकलच्या दरवाज्यात मोबाईलवर बोलणाऱ्यांच्या हातावर फटका मारुन मोबाईल खाली पाडला जातो. 

स्थानकावर उभा असणाऱ्या त्यांच्या टोळीचा सदस्य  मोबाईल झेलतो आणि पसार होतो. नेमका असाच प्रयत्न करणाऱ्या एकाला अंधेरीत रेल्वे पोलिसांनी पकडले आहे.

Read More