Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडत असाल तर ठाण्याकडील प्रवास टाळाच; कारण...

Thane Railway Station: मुंबई किंवा उपनगरांमध्ये राहत असाल आणि रविवारी, 23 फेब्रुवारी रोजी ठाण्याला जाण्याचा किंवा ठाणे मार्गाने जाण्याचा विचार असेल तर ही बातमी वाचाच.

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडत असाल तर ठाण्याकडील प्रवास टाळाच; कारण...

Thane Railway Station: मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी (23 फेब्रुवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतुकीलाही मेगाब्लॉकचा फटका बसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या कालावधीमध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे - कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा, धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे मुख्य मार्गावर असा असेल मेगाब्लॉक

कुठे : ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर धावतील.

कधी : सकाळी 10.40 वाजल्यापासून दुपारी 3.40 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल असणार आहे.

परिणाम : ब्लाॅक कालावधीत ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा, धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

ट्रान्सहार्बर मार्गावर असा असेल मेगाब्लॉक

कुठे : ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर धावतील

कधी : सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक काळातील वेळापत्रकानुसार धावतील.

परिणाम : ब्लाॅक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ/पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर असा असेल मेगाब्लॉक

कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

कधी : सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा, धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

ठाण्यातून प्रवास टाळलेला बरा

एकंदरित 23 फेब्रुवारीचं रेल्वेचं नियोजन पाहिल्यास मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठाणे स्थानकामधून प्रवास टाळणं अधिक सोयीचं ठरणार आहे. या स्थानकामध्ये दोन्ही मार्गांवरील मेगाब्लॉकचा परिणाम होणार असल्याने प्रवासामध्ये हाल होऊ शकतात अशी चिन्हं दिसत आहेत.

Read More