Mumbai Local Viral Video: मुंबई लोकल आणि भांडणे हे समीकरण ठरलेले असते. लोकलमध्ये गर्दीच्या वेळी सीटवरुन बऱ्याचदा भांडणे होत असतात. तर अनेकदा काही ग्रपदेखील असतात. असाच एक प्रकार कसारा लोकलमध्ये घडला आहे. कसारा लोकलमध्ये चाकरमानी दादागिरी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. प्रवाशांनीच हा व्हिडिओ चित्रीत करुन व्हायरल केला आहे.
कसारा ते कल्याणदरम्यान लोकल ट्रेनमध्ये आज सकाळी मोठा गोंधळ उडाला. दररोज कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पहाटे 6:10 वाजताच्या लोकल ट्रेनमध्ये, दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या एका ग्रुपने सीट राखून ठेवण्यासाठी दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला. या ग्रुपमधील एका प्रवाशाने स्वतः खिडकीच्या सीटवर बसत, शेजारच्या दोन सीट्सवर आपली बॅग ठेवली आणि इतर प्रवाशांना तिथे बसण्यास मज्जाव केला.
Local Train Video | दोन्ही सीट आमच्या! " कसारा लोकलमध्ये चाकरमान्यांची दादागिरी, प्रवाशांचा गोंधळ – मोबाईल व्हिडिओ व्हायरल!
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 4, 2025
.
.#localtrain #viralvideo #marathinews #zee24taas #kasaralocal pic.twitter.com/Zefog2Nra7
या ग्रपुमधील त्या व्यक्तीचा स्पष्टपणे आग्रह होता की, आमचा माणूस येणार आहे, दोन्हीही सीट आमच्या आहेत, तुम्हाला जे करायचं आहे करा."या बोलण्यामुळे अन्य प्रवाशी संतप्त झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला. काही प्रवाशांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला.व्हिडिओ शूट होताच संबंधित ग्रुपने माघार घेतली.
मात्र हा प्रकार फारच धक्कादायक होता. या प्रकारामुळे सकाळच्या वेळेस रेल्वेचा प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना जागा असूनही उभं राहून प्रवास करावा लागतो. यामुळे मुंबई लोकलमधील अशा गटबाजी व दादागिरीवर रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
ANs:मुंबईच्या कसारा लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशांच्या ग्रुपने सीट राखून ठेवण्यासाठी दादागिरी केल्याचा प्रकार घडला.
ANs: हा प्रकार कसारा ते कल्याणदरम्यान, पहाटे 6:10 वाजताच्या लोकल ट्रेनमध्ये आज सकाळी (4 ऑगस्ट 2025) घडला.
ANs: व्हिडिओ शूट होताच संबंधित ग्रुपने माघार घेतली, पण हा प्रकार सामान्य प्रवाशांसाठी धक्कादायक होता.