Mumbai Local Train News: मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प MUTPअंतर्गंत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC)ने MUTP-4 पुढील पावलं उचलली आहेत. या नवीन टप्प्यात मध्य आणि पश्चिम रेल्वे दरम्यान थेट रेल्वे कनेक्टिव्हीटी, नवीन लोकल कॉरिडॉर, कवच आणि कम्युनिकेशन बेस्ट ट्रेन कंट्रोल (CBTC) सारख्या प्रगत सुरक्षा प्रणाली आणि 15 डब्यांच्या आणि वातानुकूलित गाड्या वाढवणे अशा महत्त्वकांक्षी योजनांचा समावेश असणार आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेमधील कवच 5.0, CBTC (कॅब सिग्नलिंग), एसी लोकल ट्रेन, १५-डब्यांच्या लोकल आणि बरेच नवीन योजनांचा समावेश असेल. भारतीय रेल्वे, एमआरव्हीसी, एमएमआरडीए, सिडको आणि मेट्रो यांच्या प्रस्तावित प्रकल्पांचा व चालू प्रकल्पाचा आढावादेखील घेण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवासाची मागणी, उपनगरीय रेल्वे गाड्यांची सुरक्षितता आणि स्थानकातील मॉडल यावर प्रकल्पाची आरेखन केले जाईल.
प्रवाशांच्या मागणीचा अंदाजः एमएमआरएमधील सर्व मंजूर आणि चालू असलेल्या रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांचा विचार करुन 2030, 2035, 2040 आणि 2047 या वर्षांसाठी अंदाजित उपनगरीय रेल्वे मागणीचे मूल्यांकन करा
कॉरिडॉर विस्तार: सध्याच्या उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या विस्ताराची योजना असून, नवीन कॉरिडॉर आणि मुख्य मार्ग आणि उपनगरीय कामकाज वेगळे करण्यासाठी अतिरिक्त रेल्वे रूळांची बांधणी करा. यामध्ये 15 डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म विस्तार आणि अधिक मागणी असलेल्या मोक्याच्या ठिकाणी नवीन टर्मिनल विकसित करणे.