Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

विचित्र कपडे घालून परदेशी तरुण मुंबईच्या लोकलमध्ये चढला, पुढे जे झालं ते पाहून प्रवाशीही हैराण

Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक परदेशी तरुण ट्रेनमध्ये शिरला त्यानंतर जे झालं ते एकदा पाहाच  

विचित्र कपडे घालून परदेशी तरुण मुंबईच्या लोकलमध्ये चढला, पुढे जे झालं ते पाहून प्रवाशीही हैराण

Scottish Bagpiper In Mumbai Local: मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण तर नेहमीचेच झाले आहे. पण सध्या मुंबई लोकलचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये अचानक एक स्कॉटिश बॅगपायपर चढला आणि त्यानंतर जे काही झालं त्यामुळं लोकलमधील प्रवासीदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. स्कॉटिश संगीतकार रॉबिन एल्डर्सलो जानेवारीत मुंबईत आला होता तेव्हा त्याने मुंबई लोकलमधून प्रवास केला होता. त्याच्या या प्रवासाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

रॉबिन एल्डर्सलो याने मुंबई लोकलचा अनुभव तर घेतलाच पण त्याचबरोबर लोकलमधील नागरिकांनाही या अनोख्या म्युझिकल इंस्ट्रूमेंटला ऐकण्याची संधी मिळाली. पहिल्या व्हिडिओत रॉबिन संपूर्ण पारंपारिक स्कॉटिश युनिफॉर्म असलेला हिरवा ब्लेझर, किल्ट आणि प्लेड सॅश घालून खचाखच गर्दीने भरलेल्या लोकलच्या सेंकड क्लास डब्यात चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. लोकलमधील इतर नागरिकांप्रमाणेच लोकांना धक्का देऊन आत शिरला. 

लोकलमध्ये शिरल्यानंतर त्याचा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट काढले आणि लोकलमधील प्रवाशांनाच श्रोते बनवले. दुसऱ्या व्हिडिओत त्याने बॅगपायपर वाजवायला सुरुवात केली. रॉबिनचे संगीत ऐकून लोकलमधील प्रवासी आनंदीत तर झाले पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात थोडा विरंगुळा मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. काही जण व्हिडिओ रेकॉर्ड करत होते तर काही जण रील बनवत होते. 

तिसऱ्या व्हिडिओत अखेर रॉबिनला लोकलमध्ये बसायला सीट मिळाली. रॉबिनला लोकलमध्ये सीट मिळाली याचा अर्थ प्रेक्षकांना त्याची कला आवडली याची पोचपावती होती. लोकलच्या डब्यातील प्रवाशांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले. या व्हिडिओत आणखी एक प्रसंगाने लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे, रॉबिनने कला सादर करायला सुरुवात केली तेव्हा एका व्यक्तीने कानावर हातच ठेवले. दिवसभराच्या कामाने थकलेला असल्याकारणाने अचानक जोरात संगीताचा आवाज आल्यामुळं कदाचित त्याच्याकडून ती कृती घडली असावी. मात्र त्यानंतर लगेचच दोन सेकंदात त्याने रॉबिनच्या कलेला दाद देण्यास सुरुवात केली. या प्रवाशाने नंतर टाळ्या वाजवत त्याच्या केचेला प्रत्साहन दिले. 

Read More