Mumbai Local Harbor Line Mega Block News: हार्बर रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. हार्बर रेल्वे मार्गावर आजपासून रात्रकालीन ब्लॉक वाशी स्थानकात घेण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कामामुळं मेगाब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवार (ता. 5) ते शुक्रवार (ता. 8) दरम्यान दररोज रात्री 10.45 ते पहाटे 3.45 या वेळेत अप व डाउन मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणारं आहे. या कालावधीत वाशी ते पनवेलदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
ब्लॉकदरम्यान काही लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. काही गाड्या ठरावीक स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. बेलापूरहून रात्री 8.54 वाजता सुटणारी बेलापूर-सीएसएमटी लोकल वाशीपर्यंतच धावेल, तर रात्री 9.16ची बेलापूर-सीएसएमटी लोकल वडाळा रोडपर्यंतच धावणार आहे. वांद्रे-सीएसएमटी लोकल रात्री 10 वाजता सुरू होऊन वडाळा रोडवरच थांबवण्यात येणार आहे. पनवेलहून रात्री 10.55 आणि 11.32 वाजता सुटणाऱ्या पनवेल-वाशी लोकल सेवा नेरूळपर्यंतच चालविण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावरील ब्लॉकदरम्यान वाशी स्थानकातून पहाटे 4.03, 4.15, 4.25, 4.37, 4.50 आणि 5.04 वाजता सुटणाऱ्या अप लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सीएसएमटी स्थानकातून रात्री 9.50, 10.14 आणि 10.30 वाजता सुटणाऱ्या डाउन लोकल सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे.
-वाशी ते पनवेल: या दरम्यान सर्व लोकल सेवा पूर्णपणे बंद राहतील.
-बेलापूर-सीएसएमटी: रात्री 8:54 वाजता सुटणारी लोकल वाशीपर्यंतच धावेल. रात्री 9:16 वाजता सुटणारी लोकल वडाळा रोडपर्यंत धावेल.
-वांद्रे-सीएसएमटी: रात्री 10:00 वाजता सुटणारी लोकल वडाळा रोडवर थांबवली जाईल.
-पनवेल-वाशी: रात्री 10:50 आणि 11:32 वाजता सुटणाऱ्या लोकल नेरूळपर्यंतच धावतील.
-वाशीहून सुटणाऱ्या अप लोकल: 5 आणि 6 ऑगस्ट रोजी पहाटे 4:03, 4:15, 4:25, 4:37, 4:50 आणि 5:04 वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील.
-7 आणि 8 ऑगस्ट रोजी फक्त पहाटे 4:03 आणि 4:25 वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द होतील.
-सीएसएमटीहून वाशीकडे जाणाऱ्या डाउन लोकल: रात्री 9:50, 10:14 आणि 10:30 वाजता सुटणाऱ्या लोकल सर्व चार रात्री रद्द राहतील.
- वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) सिस्टमच्या कमिशनिंगसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे.
- रात्रकालीन ब्लॉक 5 ऑगस्ट 2025 (मंगळवार) ते 8 ऑगस्ट 2025 (शुक्रवार) दरम्यान दररोज रात्री 10:45 वाजेपासून पहाटे 3:45 वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गावर लागू असेल.