Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

दरवाढीच्या झळा! रेल्वे स्थानकावर मिळणारा वडापाव महागला; आता मोजा ‘इतके’ पैसे...

Indian Railway : सामान्यांचा रेल्वे प्रवासच एका अर्थी महागला... अर्थात प्रवासात जर भूक लागली तर आधी खिशात पुरेसे पैसे आहेत का पाहूनच घ्या   

दरवाढीच्या झळा! रेल्वे स्थानकावर मिळणारा वडापाव महागला; आता मोजा ‘इतके’ पैसे...

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करत असताना अनेकदा फलाटांवर काही खाद्यपदार्थांची, अल्पोपहाराची दुकानं पाहायला मिळतात. प्रवासादरम्यान भूक लागली की आपोआपच अनेकांची पावलं त्या दुकानांकडे वळतात आणि मग तिथं गोळ्याबिस्कीटांपासून ते अगदी सरबत, वडापाव, समोसा अशा पदार्थांची खरेदी प्रवासी करतात. सहसा या पदार्थांची किंमत 10, 20 आणि फारफारतर 30 रुपयांच्या घरात असते. इथून पुढं मात्र हे दर काहीसे बदललेले असतील. 

रेल्वे स्थानकांवरील फलाटांवर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर मिळणारा वडापाव आता महागला असून त्यासाठी 13 ऐवजी 18 रुपये मोजावे लागणार आहेत. इतकंच नव्हे, तर या दुकानांवर आता शेवपुरी, दाबेलीही मिळणार आहे. असं असलं तरीही ट्रेनची प्रतीक्षा करताना भूक लागली असतानाच नवीन खाद्यपदार्थांचा आनंद घेणाऱ्या प्रवाशांना दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. 

सुधारित दरपत्रकानुसार नवे दर पाहून घ्या 

महागाई सातत्यानं वाढत असल्या कारणानं रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वेकडून दरवाढ करुन त्यांना दिलासा देण्यात आला. मात्र अचानक मोठी दरवाढ केल्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र नाराजीचा सूर पाहायला मिळाला. लिंबू आणि कोकम सरबतचे दर 6 रुपयांवरुन 5 रुपये करण्यात आले असले तरीही त्याचं प्रमाण मात्र 200 मिलीलिटरऐवजी 150 मिलिलिटर इतकं करण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : Indian Railway ची रामायण यात्रा! नेपाळ ते रामेश्वरमचा टप्पा, 17 दिवसांच्या प्रवासासाठी किती खर्च?

महागाई वाढत असल्या कारणानं त्याचा थेट परिणाम रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवरही झाला आहे. (western railway) पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून या सुधारित दरपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळं 1 जुलैपासून हे नवं दरपत्रक आणि त्यातील नवे दर लागूही करण्यात आले आहेत. याआधी 2021 मध्ये पश्चिम रेल्वेनं खाद्यपदार्थांच्या दरात बदल करण्याबाबतचा असाच निर्णय घेतला होता. 

रेल्वे स्थानकांवर मिळणारा वडापावच नव्हे, तर आता भेळही महागल्याचं म्हटलं जात आहे. नव्या दरांनुसार, व्हेज पफ 35 रुपये, शेवपुरी 45, दाबेली 20 रुपये, चायनीज भेळ 30 रुपये, व्हेज हॉटडॉग 35 रुपये, रुपये आणि व्हेज चिज टोस्ट सँडविच 50 रुपयांना मिळणार आहे. 

Read More