Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉकची घोषणा; 4 मेपर्यंत शेवटची CSMT-Karjat लोकल बदलापूरपर्यंतच, पाहा लोकलचे वेळापत्रक

Mumbai Local Megablock Update:  मुंबईकरांनो लक्ष द्या. मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला असून त्यामुळं लोकलचं वेळापत्रक बदललं जाणार आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉकची घोषणा; 4 मेपर्यंत शेवटची CSMT-Karjat लोकल बदलापूरपर्यंतच, पाहा लोकलचे वेळापत्रक

Mumbai Local Megablock Update:  मेपर्यंत कर्जतला जाणारी शेवटची लोकल सीएसएमची स्थानकातून साडे अकरा वाजताच सुटणार आहे. त्यामुळं प्रवाशांना आता हे बदललेले वेळापत्रक लक्षात ठेवावे लागणार आहे. मध्य रेल्वेकडून भिवपुरी रोड ते कर्जतदरम्यान मेगाब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळं बुधवारी 30 एप्रिलपासून रविवारी 4 मेपर्यंत फक्त रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. कसं असेल रेल्वेचे वेळापत्रक जाणून घेऊया.

मध्य रेल्वेवर कल्याण ते कर्जत विभागातील भिवपुरी रोड-कर्जतदरम्यान पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवार 30 एप्रिल ते रविवारी 4 मेपर्यंत रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. मध्यरात्री 2 ते 3.30 पर्यंत दीड तासांचा ब्लॉक असून या कालावधीत लोकलच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून रविवारपर्यंत रात्रीची शेवटची सीएसएमटी-कर्जत लोकल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही लोकल कर्जतऐवजी बदलापूरपर्यंतच धावणार आहे. तसंच, उशिरा धावणाऱ्या मेल एक्स्प्रेस आवश्यकतेनुसार वळवल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. या विशेष ब्लॉकमुळे काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांना पनवेल आणि ठाणे येथे थांबा देण्यात आला आहे. आठ मेल-एक्स्प्रेस गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात आल्या आहेत. 

मेगाब्लॉकचे वेळापत्रक

सीएसएमटी येथून कर्जतसाठी रात्री 12.12 वाजता सुटणारी लोकल बदलापूरपर्यंतच चालवण्यात येणार आहे. ही लोकल बदलापूर ते कर्जतदरम्यान रद्द केली जाईल. कर्जत येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रात्री 2.30 वाजता सुटणारी लोकल बदलापूर येथून चालवण्यात येईल. ही लोकल कर्जत ते बदलापूरदरम्यान रद्द केली जाईल. 

Read More