Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Mumbai Mega Block: मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेने प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा!

Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.

Mumbai Mega Block: मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेने प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा!

Sunday Mumbai Mega Block : मध्य रेल्वे रविवार म्हणजेच येत्या 15 जानेवारीला (Sunday) देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड (Matunga To Mulund) दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तसेच निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरानं गंतव्यस्थानी  पोहोचतील, अशी माहिती मिळाली आहे. ()

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. पुढे या सेवा पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी  पोहोचतील.

कसं असेल वेळापत्रक?

पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (Down Harbour Line) सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (नेरुळ/बेलापूर-खारकोपर लाईन वगळून)

पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील (Up Harbour Line) सेवा मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील (Trans harbor Line) सेवा रद्द राहतील.

आणखी वाचा - Breaking News : दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना; एअरपोर्ट एकच खळबळ

दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी (CSMT to Vashi) दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ - खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.

Read More