Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईतील ही महत्त्वाची मेट्रो मार्गिका थेट लोकल आणि विमानतळाला जोडणार, ऑगस्टपर्यंत सेवेत येण्याची शक्यता


Mumbai Metro 3:मुंबई मेट्रो 3 चा तिसरा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. कशी असेल ही मार्गिका जाणून घ्या

 मुंबईतील ही महत्त्वाची मेट्रो मार्गिका थेट लोकल आणि विमानतळाला जोडणार, ऑगस्टपर्यंत सेवेत येण्याची शक्यता

Mumbai Metro 3: भुयारी मेट्रो 3 ला देखील गती मिळाली आहे. सध्या  मेट्रो 3 ही आरे-जेव्हीएलआरपासून अत्रे चौकापर्यंत धावत असून यापुढे अत्रे चौकापासून कफ परेडपर्यंतचा टप्पा ऑगस्टपर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे. मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी 19 महत्त्वाच्या कंत्राटांना 24 जूनला मंजुरी दिली असतानाच आता दुसरीकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून भुयारी मेट्रो 3 ला देखील गती मिळत आहे.

अत्रे चौकापासून कफ परेडपर्यतच्या मार्गात  मंत्रालयासह महत्त्वाची कार्यालये असून, लोकलसह उर्वरित प्रवासी साधनांनी धावपळ करत ही ठिकाणे गाठणाऱ्या प्रवाशांना भुयारी मेट्रो वरदान ठरणार आहे. विमानतळासोबत घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या मेट्रो 1 ला देखील मेट्रो 3 जोडली आहे. शिवाय मेट्रो 2 ब देखील बीकेसीमध्ये मेट्रो 3 ने जोडण्यात येणार असून, मेट्रो 6 ला देखील आरे येथे मेट्रो 3 ची जोडणी दिली जाणार आहे.मेट्रो 3 मार्गिका पश्चिम व मध्य रेल्वेमार्गावरील चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससोबत जोडली जाणार आहे. 

मेट्रो 3 वर अशी असतील स्थानके

कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.

कशी आहे भुयारी मेट्रो

33.5 किमी
भुयारी मेट्रो : 3
12.67 किमी
आरे ते बीकेसी : पहिला टप्पा 12.67 किमीचा ऑक्टोबरमध्ये सुरू.
बीकेसी ते आरे : मे महिन्यात दुसरा टप्पा सुरू.
आरे जेव्हीएलआर ते कफ परेड हा पूर्ण टप्पा ऑगस्टमध्ये सुरू होईल.
12 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कामे
24 जूनला रोजी मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएकडून 12 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

Read More