Mumbai Metro News Update: मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे उभे करत आहेत. अलीकडेच मुंबईतील मेट्रोना एकत्र जोडणारा महत्त्वाचा टप्पा पार पडला. मेट्रो 7A मार्गिकेसाठी भूमिगत बोगद्याचा ब्रेकथ्रु लवकरच पार पडला आहे. मेट्रो 7A हा मुंबईतील मेटो प्रकल्पाना एकत्र जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) ते अंधेरी पूर्व मेट्रो 7 ह्या मुंबईतील दुसऱ्या भुयारी मेट्रोचा दुसरा बोगदा मेअखेर पूर्ण होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून मेट्रो 7 अ मार्गिकेची उभारणी सुरू असून, 3.4 किमी लांबीच्या या मार्गिकेवर एकूण दोन मेट्रो स्थानके आहेत. यातील डाऊनलाईन मार्गाच्या बोगद्याचे काम 'दिशा' या टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. जवळपास 1.65 किमी लांबीचा हा मार्ग आहे. आता दुसऱ्या बोगद्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यावर एमएमआरडीएचा भर आहे
दुसऱ्या बोगद्याचे केवळ 100 मीटरचे काम शिल्लक असून या मार्गिकेचा हा अवघड टप्पा मे अखेपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मार्गिका सुरू करण्यासाठी दीड वर्ष लागतील, असा अंदाज आहे. उर्वरित कामे पूर्ण होऊन मार्गिका सुरू होण्यासाठी डिसेंबर 2026 उजाडणार आहे.
लांबी : 3.4 किमी (उन्नत 0.94 किमी, भूमिगत 2.503 किमी)
स्थानके: 2 (उन्नत - एअरपोर्ट कॉलनी, भूमिगत - आंतरराष्ट्रीय विमानतळ टी२)
उन्नत मेट्रो मार्गाची लांबी (व्हायाडक्ट) : 0.57 किमी
रॅम्पची लांबी : 0.309 किमी
दुहेरी बोगद्यांची लांबी : 2.034 किमी
बोगद्याचा व्यास : 6.35 मीटर
मीरा भाईंदरची थेट विमानतळाशी जोडणी
मेट्रो 7 अ मार्गिकेमुळे मीरा भाईंदर येथून निघालेल्या नागरिकांना थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 ला पोहोचता येणार आहे.
मेट्रो 9 मार्गिका, मेट्रो 7 मार्गिका आणि मेट्रो 7अ या तीन मेट्रो जोडल्या जाणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.