Mumbai Metro 2B: मुंबईकरांच्या सेवेत लवकरच आणखी एक मेट्रो धावणार आहे. मेट्रो 2 ब – मंडाले कारशेडचे ९७ टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच कारशेडमध्ये गाड्यांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. अत्यंत महत्त्वाच्या अशा मंडाले कारशेडच्या कामाच्या पुर्णत्वास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार आतापर्यंत कारशेडचे ९७ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळं लवकरच मेट्रो 2ब धावणार आहे. एकदा का हा मेट्रो मार्ग सुरू झाला की प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिरणाच्या (एमएमआरडीए) अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन असा पहिला टप्पा डिसेंबरअखेर वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएने नियोजन आहे. त्यानुसार आता एमएमआरडीएने या टप्प्याच्या कामाला वेग दिला असतानाच दुसरीकडे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा मंडाले कारशेडच्या कामाच्या पुर्णत्वास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार आतापर्यंत कारशेडचे 97 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. तर आता विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून 8 एप्रिलपासून कारशेडमधील विद्युत प्रवाह सुरु होणार आहे. त्यामुळे आता लवकरच कारशेडमध्ये मेट्रो गाड्यांच्या इतर चाचण्यांना सुरुवात होणार असून पहिला टप्पा सुरु करण्याच्यादृष्टीने हे एमएमआरडीएचे महत्त्वाचे पाऊल आहे.
मेट्रो 2 B हा मेट्रो मार्ग अंधेरी पश्चिम डीएन नगर ते मंडाले डेपो असा आहे. या मेट्रो मार्गिकेची एकूण लांबी 24 किमी असून एकूण 20 स्थानके असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा खर्च 10,986 कोटी इतका असणार असून मेट्रो 2A दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर मार्गिकेचाच विस्तार आहे. सध्या या मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा या वर्षाअखेर सुरू होऊ शकतो. मेट्रो 2ब मार्गिकेचा चेंबूर डायमंड मार्केट ते मंडाले असा पहिला टप्पा आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं हार्बर मार्गावरुन पश्चिम उपनगरात येणे सहज शक्य होणार आहे. मात्र हा संपूर्ण मार्ग सुरू होण्यासाठी जून 2025 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
ईएसआयसी नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खिरा नगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे मेट्रो, आयकर कार्यालय, आयएलएफएस, एमटीएनएल मेट्रो, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला (पू), ईईएच चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द, मंडाले मेट्रो अशी स्थानकं या मार्गावर असणार आहेत.
मेट्रो 2B हा मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो मार्ग -2अ (दहिसर ते डी एन नगर), मेट्रो मार्ग-3 (कुलाबा ते सिप्झ) आणि मेट्रो मार्ग -4 (वडाळा ते कासारवडवली) या महत्वाच्या मार्गांना जोडणारा आहे.