Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मिरा-भाईंदरहून आता थेट मुंबईत पोहोचा, आणखी एका मेट्रोने पूर्ण केला महत्त्वाचा टप्पा, पाहा स्थानके!

Mumbai Metro Update: मुंबई मेट्रोने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मेट्रो 7 ए एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

मिरा-भाईंदरहून आता थेट मुंबईत पोहोचा, आणखी एका मेट्रोने पूर्ण केला महत्त्वाचा टप्पा, पाहा स्थानके!

Mumbai Metro Update: मुंबईसह उपनगरात मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. उपनगरात विविध भागात मेट्रोचे काम सुरू आहे. अलीकडेच मेट्रो 3चा तिसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आणखी एक भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. मेट्रो 7 अच्या 1.65 किमी अपलाइन बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं मुंबईतील दुसरी भुयारी मेट्रोमार्गिका लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

मुंबईतील दुसरी भुयारी मेट्रोमार्गिका असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी 2) ते अंधेरी पूर्व 7 अ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मेट्रो मार्गिकेवरील 1.65 किमी लांबीच्या अपलाइन बोगद्याचे भुयारीकरण सोमवारी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेने आणखी एक टप्पा पार केला असून, पुढील वर्षात मीरा भाईंदरची थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणी मिळण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मेट्रो 7 अ मार्गिकेची उभारणी सुरू असून, ती 3.4 किमी लांबीची आहे. या मेट्रो मार्गिकेवर एकूण दोन मेट्रो स्थानके आहेत. यातील डाऊनलाइन मार्गाचे भुयारीकरण 17 एप्रिलला पूर्ण झाले होते. त्यानंतर पुढील तीन महिन्यात आता दुसऱ्या बाजूच्या बोगद्याचेही भुयारीकरण पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएने दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम 4 नोव्हेंबर 20023 ला सुरू केले होते. मेट्रो 3 मार्गिकेचा बोगद्याच्या बाजूने या मेट्रोचे भुयारीकरण करण्यात आले आहे. तसेच सहार उड्डाणपुलाच्या रॅम्पखालून हा भुयारी मार्ग गेला. त्यामुळे वाहतूक वर्दळ सुरू असलेल्या सहार उड्डाणपुलाखाली भुयारीकरण करणे, हे आव्हानात्मक काम होते. तसेच या बोगद्याच्या मार्गात मोठ्या भूमिगत मलजल वाहिन्या, पाण्याची मोठी मार्गिका होती. त्यातूनही मार्ग काढत पावणेदोन वर्षात हे भुयारीकरण एमएमआरडीएने पूर्णत्वास नेले.

एमएमआरडीने या मेट्रोच्या भुयारी मार्गात 6 भागांमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रिकास्ट रिंग सेगमेंट्सचा वापर टनेल लाइनर म्हणून केला आहे. तसेच अंतिम बोगद्याचा व्यास 5.6 मीटर आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मेट्रो 7 ए हा मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मुंबईतील 7 मेट्रो प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार आहेत. मेट्रो 7ए च्या 3.4 किमीच्या प्रकल्पामुळं वसई विरार, मिराभाईंदर तसेच ठाणे; नवी मुंबईसारखे परिसर थेट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहेत. मेट्रो 7A वर दोन स्थानके असणार आहेत 1 - एअरपोर्ट कॉलनी आणि 1 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी दोन स्थानके असणार आहेत. मेट्रो मार्ग 7 अने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो मार्ग ३ आणि आंतराष्ट्रीय विमानतळादरम्यान भूमिगत स्थानकावर आंतरबदल(interchange) करण्याची सुविधा सहज उपलब्ध होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसोबतच इतर शहरांना जोडणी देणार आहे. 

Read More