Mumbai Metro 9 Update: दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो लवकरच धावणार आहे. मेट्रोच्या चाचण्या या महिन्यात सुरू करु शकतात, असे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून शनिवारपासून या मेट्रो मार्गिकेवर विद्युत प्रवाह कायमस्वरुपी कार्यान्वित केला जाणार आहे. या मेट्रोमुळं नागरिकांचा प्रवास सुकर होणार असून यामुळं विरार लोकलमधील गर्दीदेखील कमी होण्याची शक्यता आहे.
एमएमआरडीएकडून दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेची उभारणी केली जात आहे. या मेट्रो मार्गिकेची लांबी 13.6 किमी असून 10 स्थानके असणार आहे. मात्र एकूण मार्गिकेपैकी पहिला 4.5 किमीपर्यंतचा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. दहिसर ते काशीगावपर्यंत पहिला टप्पा असणार आहे. तर, डिसेंबरच्या आधी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी 6,607 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात चार स्थानके असणार आहेत. दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव, काशीगाव अशी स्थानके आहेत. एमएमआरडीएकडून गाडीच्या चाचण्यांसह वजनासह चाचण्या, सिग्नलिंग यंत्रणा आणि ट्रॅक्शनच्या चाचण्या केल्या जातील. त्यानंतर विविध यंत्रणांकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया एमएमआरडीएकडून सुरू केली जाईल, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
मेट्रो 9 मार्गिकेवर दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असणार आहे. तर, काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान असा दुसरा टप्पा असणार आहे. या मेट्रोमुळं दहिसर नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. ही मेट्रो वेस्टन एक्स्प्रेस हायवे, वेस्टर्न रेल्वे आणि सध्या सुरू असलेली मेट्रो 2 ए (दहिसर ते डीएन नगर) आणि मेट्रो मार्ग अंधेरी (ई) ते दहिसर (ई) पर्यंत संपर्क प्रदान करेल. म्हणजेच मेट्रो 9 थेट लोकलला थेट कनेक्ट होणार आहे. तसंच, वाहतूक कोंडीदेखील कमी होणार आहे.
1. दहिसर, 2. पांडुरंग वाडी, 3. मिरागाव, 4. काशीगाव, 5. साई बाबा नगर, 6. मेदितिया नगर, 7. शहीद भगतसिंग गार्डन, 8. सुभाषचंद्र बोस स्टेडियम