Mumbai Metro Project : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना गती मिळणार आहे. मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी 19 महत्त्वाच्या कंत्राटांना मंजुरी मिळाली आहे. एमएमआरडीएकडून 12,000 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मुंबईतील उपनगरे मेट्रोने जोडली आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद झाला आहे. आता हा प्रवास अधिक जलद होणार आहे.
एमएमआरडीएने 12000 कोटींहून अधिक किंमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अध्यक्ष, एमएमआरडीए) यांच्या नेतृत्वाखाली आणि एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीत मेट्रो प्रकल्पांना मंजिरी देण्यात आली.
मेट्रो मार्ग आणि अटल सेतूसह विविध महत्त्वाच्या कामांतील कत्राटांरांच्या नेमणुकीसाठी मंजुरी देण्यात आली. या कंत्राटांत प्रणाली, रोलिंग स्टॉक, नागरी कामे, ट्रॅक्शन पॉवर, एएफसी प्रणाली, डेपो पायाभूत सुविधा आणि मल्टी-मोडल इंटिग्रेशन (एमएमआय) यांचा समावेश आहे.
प्रमुख प्रकल्प व मंजूर कंत्राटांची यादी
1. ₹4,788 कोटी – मेट्रो लाईन 4 आणि 4A
Larsen & Toubro Ltd. ला एकात्मिक प्रणाली—रोलिंग स्टॉक, CBTC सिग्नलिंग, दूरसंचार, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स (PSD) आणि डेपो उपकरणांसह—पुरवठा व 5 वर्षांच्या म सर्वसमावेशक देखभालीसाठी कंत्राट मंजूर.
2. ₹557.55 कोटी (सुधारित) – मेट्रो लाईन 4A
गव्हाणपाडा आणि गायमुख स्थानकांसाठी सिव्हिल कामांमध्ये सुधारित डिझाईन आणि स्थळ-आधारित बदलांसह सुधारित कंत्राट मूल्य मंजूर.
3. ₹188.59 कोटी – मेट्रो लाईन 4
L&T ला भक्ती पार्क ते मुलुंड अग्निशमन केंद्र दरम्यान बॉलस्टलेस ट्रॅक व पॉकेट ट्रॅकसह काम मंजूर, हे मूळ अंदाजापेक्षा 15.72% नी कमी दरात मंजूर.
4. ₹668.15 कोटी – मेट्रो लाईन 6
IRCON International Ltd. ला स्वामी समर्थ नगर ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) मार्गासाठी पॉवर सप्लाय, ट्रॅक्शन, E&M प्रणाली, लिफ्ट आणि एस्केलेटर यांची रचना व स्थापनेसाठी आणि 5 वर्षांच्या सर्वसमावेशक देखभालीसाठी कंत्राट मंजूर.
5. ₹551.41 कोटी (सुधारित) – एमटीएचएल पॅकेज 4
ITS प्रणाली, टोल व्यवस्थापन, प्रगत वाहतूक नियंत्रण प्रणाली (ATMS), स्ट्रीट लाईटिंग, प्रशासकीय इमारती आणि सेंट्रल कंट्रोल सेंटरसाठी सुधारित कंत्राट मंजूर.
6. ₹2,269.66 कोटी – मेट्रो लाईन 6
NCC Ltd. ला रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, टेलिकॉम प्रणाली, PSDs आणि डेपो यंत्रणा पुरवठा व स्थापनेसाठी व 5 वर्षांच्या देखभालीसाठी कंत्राट.
7. ₹104.66 कोटी (सुधारित) – मेट्रो लाईन 6
सामान्य सल्लागार (General Consultant ) साठी 680 दिवसांची मुदतवाढ व 39.61% खर्चवाढ मंजूर.
8. ₹535.08 कोटी – मेट्रो लाईन 4 व 4A साठी मल्टी-मोडल इंटिग्रेशन (MMI)
32 स्थानकांवरील MMI कामे 4 पॅकेजमध्ये मंजूर:
o पॅकेज 1: N A Construction – J. Kumar JV (₹139.71 कोटी)
o पॅकेज 2: Dev Engineers – PRS Infra JV (₹128.84 कोटी)
o पॅकेज 3: N A Construction (₹140.25 कोटी)
o पॅकेज 4: N A Construction – SARE JV (₹126.26 कोटी)
9. ₹432.63 कोटी (सुधारित) – मेट्रो लाईन 2A
DMRC ला ‘Deposit Work’ अटींनुसार विस्तारलेल्या कालावधीसाठी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त सल्लागार शुल्क मंजूर.
10. ₹118.28 कोटी – मेट्रो लाईन 9 व 7A
Leena Powertech–Umesh Brothers JV ला उत्तर-दक्षिण मेट्रो मार्गासाठी OHE, केबल, विद्युत वितरण व SCADA प्रणाली स्थापनेसाठी कंत्राट मंजूर.
11. ₹249.97 कोटी – मेट्रो लाईन 4 व 4A
Aurionpro Solutions Ltd. ला AFC प्रणालीसाठी कंत्राट मंजूर, वडाळा ते गायमुख मार्गासाठी व 5 वर्षांच्या सर्वसमावेशक देखभालीसह.
12. USD 7.59 मिलियन + ₹14.29 कोटी – एकाधिक लाईन्ससाठी रेल पुरवठा
Mitsui & Co., Nippon Steel, Mitsui India यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे 1080 ग्रेडचे 6,900 मेट्रिक टन हेड हार्डन केलेले रेल पुरवले जाणार.
13. ₹99.99 कोटी – मेट्रो लाईन 2B
Paras Railtech Pvt. Ltd. ला अंधेरी वेस्ट ते आयटीओ स्टेशन दरम्यान बॉलस्टलेस ट्रॅकच्या कामासाठी कंत्राट मंजूर (मूळ खर्चाच्या 17.82% खाली).
14. ₹114.98 कोटी – पायाभूत सुविधा डिजिटल निरीक्षण प्रणाली (IDDP)
Censys Technologies Pvt. Ltd. ही प्रणाली एकत्रीकरणासाठी निवडण्यात आली, जी पायाभूत कामांचे रिअल टाइम निरीक्षण सुनिश्चित करेल.
15. ₹497.46 कोटी – मेट्रो लाईन 5 (कशेळी डेपो सहित)
IRCON International Ltd. ला 220kV RSS, OHE, SCADA, E&M कामांसह डेपो सुविधांसाठी 5 वर्षांच्या सर्वसमावेशक देखभालीसह कंत्राट मंजूर.
16. ₹79.37 कोटी – मेट्रो लाईन 2B व 7
DMRC ला रोलिंग स्टॉक व सिग्नलिंग व्यवस्थापन कामासाठी ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ मंजूर.
17. ₹70 कोटी – मेट्रो लाईन 9 व 7A
L&T Technology Services – Amnex JV ला AFC प्रणाली कंत्राट मंजूर, दोन वर्षांच्या दोष अधिसूचना कालावधीसह.
18. ₹77.38 कोटी – मेट्रो लाईन 4 व 4A (पॅकेज 1)
KBA Infrastructure – Shree Manglam Buildcon JV ला कॅडबरी व माजिवडा स्थानकांवर फूट ओव्हरब्रिज बांधकामासाठी कंत्राट मंजूर.
19. ₹129.04 कोटी – मेट्रो लाईन 4 व 4A (पॅकेज 2)
J Kumar – PRS JV ला पंतनगर, विक्रोळी, भांडुप व विजय गार्डन मेट्रो स्थानकांवरील फूट ओव्हरब्रिजसाठी कंत्राट मंजूर.