Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबई अरबी समुद्रात उंचच उंच लाटा उसळणार! 5 दिवस धोक्याचे; 19 वेळा मोठी भरती

Mumbai Weather News: 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस मुंबईत समुद्राला मोठी भरती येणार आहे.  तर यंदाच्या पावसाळ्यात 19 वेळा समुद्राला येणार मोठी भरती येणार आहे.

  मुंबई अरबी समुद्रात उंचच उंच लाटा उसळणार! 5 दिवस धोक्याचे; 19 वेळा मोठी भरती
Mumbai Weather News: मुंबईकरांना सावधानतेचा इशारा देणारी बातमी आहे.  24 जून ते 28 जून पर्यंत असे सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीदरम्यान 19 वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे. 
 
मोठी भरती याचा अर्थ  भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या पावसाळ्यातील मोठ्या भरतीचा तपशिल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भरतीचा दिनांक व वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणा-या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. 
 
यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा 26 जूनला उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिना-या नजीक जावू नये, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना पुन्हा एकदा करण्यात येत आहे.  वरीलनुसार यंदाच्या पावसाळ्या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे कळविण्यात आला आहे.  
 

या दिवशी येणार भरती

 
जून २०२५
१. मंगळवार, दि. २४.०६.२०२५ सकाळी – ११.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९
२. बुधवार, दि. २५.०६.२०२५ दुपारी – १२.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७१
३. गुरुवार, दि. २६.०६.२०२५ दुपारी – १२.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७५
४. शुक्रवार, दि. २७.०६.२०२५ दुपारी – ०१.४० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.७३ 
५. शनिवार, दि. २८.०६.२०२५ दुपारी – ०२.२६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६४ 
 
जुलै २०२५
१. गुरुवार, दि. २४.०७.२०२५ सकाळी – ११.५७ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
२. शुक्रवार, दि. २५.०७.२०२५ दुपारी – १२.४० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६६
३. शनिवार, दि. २६.०७.२०२५ दुपारी – ०१.२० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६७
४. रविवार, दि. २७.०७.२०२५ दुपारी – ०१.५६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६०
 
ऑगस्ट २०२५
१. रविवार, दि. १०.०८.२०२५ दुपारी – १२.४७ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५०
२. सोमवार, दि. ११.०८.२०२५ दुपारी – ०१.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५८
३. मंगळवार, दि. १२.०८.२०२५ दुपारी – ०१.५२ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५८
४. शनिवार, दि. २३.०८.२०२५ दुपारी – १२.१६ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५४
५. रविवार, दि. २४.०८.२०२५ दुपारी – १२.४८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५३
 
सप्टेंबर २०२५
१. सोमवार, दि. ०८.०९.२०२५ दुपारी – १२.१० वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
२. मंगळवार, दि. ०९.०९.२०२५ दुपारी – १२.४१ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.६३
३. बुधवार, दि. १०.०९.२०२५ मध्यरात्री – ०१.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९
४. बुधवार, दि. १०.०९.२०२५ दुपारी – १३.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५७
५. गुरुवार, दि. ११.०९.२०२५ मध्यरात्री – ०१.५८ वा. लाटांची उंची (मीटर्स) - ४.५९
Read More