Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

635 Sq ft परवडत नाही; 25 वर्षांपासून का अडकलाय मुंबईत मोक्याच्या ठिकाणच्या वस्तीचा पुनर्विकास?

Mumbai Redevelopment Project Latest Update : नेमकं कारण समोर... रेल्वे स्थानकापासून सारंकाही जवळ. मुंबईचं हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागामध्ये का टळतेय पुनर्विकासाची प्रक्रिया? रहिवाशांचं नव्या घराचं स्वप्न कधी पूर्ण होणार?    

635 Sq ft परवडत नाही; 25 वर्षांपासून का अडकलाय मुंबईत मोक्याच्या ठिकाणच्या वस्तीचा पुनर्विकास?

Mumbai Redevelopment Project Latest Update : मुंबईत (Mumbai News) साधारण दोन दशकांपासून मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाच्या कामांना वेग आल्याचं पाहायाला मिळालं. सुरुवातीच्या 10 वर्षांमध्ये जिथं विकासक चाळ आणि बैठ्या वस्त्यांतील घरांसह 180 चौरस फुटांच्या घरांच्या बदल्यात मुंबईकरांना 225 ते 350 Sq ft इतक्या क्षेत्रफळाचं घर देऊ करत होते त्यातच काळानुरूप भर पडली. मोठ्या विकासकांनी गगनचुंबी इमारती उभारत एका खोलीत राहणाऱ्या मुंबईकरांना 1BHK चं स्वप्न दाखवलं आणि आता त्या स्वप्नाची झेप 2BHK पर्यंतही पोहोचली आहे. मात्र विकासकांचेही काही निकष असून रहिवाशांच्या मागण्यांच्या पूर्ततेस ते असमर्थ असल्या कारणानं शहरातील बहुतांश भागांचा पुनर्विकास अद्यापही ताटकळल्याचं वास्तव पाहायला मिळत आहे. (Mumbai Real Estate)

मुंबईत मोक्याच्या ठिकाणी आहे ही वस्ती, 25 वर्षांपासून पुनर्विकासात अडथळे? 

पुनर्विकासाच्या कामाच अडथळे येत जवळपास गेल्या 25 वर्षांपासून मुंबईच्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या वस्तीतील रहिवाशी नव्या घरांची स्वप्न पाहत आहेत. हा भाग म्हणजे (Lalbaug) लालबागनजीक असणाऱ्या काळाचौकी येथील अभ्युदयनगर (Abhyudaynagar Redevelopment). 

साधारण 33 एकर भूखंडावर असणाऱ्या अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीतील 48 इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया 2000 सालापासून सुरु आहे. मात्र अद्यापही त्यावर कोणतीही सकारात्मक हालचाल मात्र दिसून येत नाही. 2012 ला या इमारतींचा समूह पुनर्विकास हाती घेण्यात आला पण तिथंसुद्धा अडथळे आले आणि अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून पुनर्विकास मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

निविदा प्रक्रिया लांबणीवर... पण नेमकं कारण काय? 

मोतीलाल नगरच्या धर्तीवर खासगी विकासकाची निवड करत पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी ऑक्टोबर 2024 मध्ये निविदा मागविण्यात आल्या. या निविदेला सात वेळा मुदतवाढही देण्यात आली मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने निविदा रद्द करून दुसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या आणि तिथंही अपेक्षित प्रतिसाद नसल्यानं ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. ज्या कारणास्तव अभ्युदयनगरचा परिणामी पुनर्विकास आणखी लांबणीवर पडला. 

हेसुद्धा वाचा : मोठ्या सुट्टीवर जाण्यापूर्वी पाऊस कोणत्या जिल्ह्यांना झोडपणार? कसं असेल मुंबईपासून विदर्भापर्यंतचं पर्जन्यमान? 

प्रत्यक्षात विकासकांना येथील 3450 रहिवाशांना 635 चौरस फुटांची घरं देणं परवडत नसल्याचं कारण समोर आलं. परिणामी यावर तोडगा काढत राज्य सरकारनं 620 चौरस फुटांच्या घरांसाठीच्या निविदा काढण्याचे आदेश दिले आणि त्या धर्तीवर ही प्रक्रिया पुढे गेली. 

निर्धारित वेळापत्रकानुसार 15 जुलैपर्यंत निविदा सादर करण्याची तारीख ठरली मात्र, 28 जुलै आणि त्यानंतर आणखी वाढीव दोन आढवड्यांची मुदतवाढ दिल्यानं काळाचौकी येथील अभ्युदयनगरचा पुवनर्विकास पुन्हा प्रतीक्षा यादीवरच राहिला. दरम्यान आता नव्या मुदवाढीमुळं इच्छुक कंपन्यांना 11 ऑगस्टपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. या संपूर्ण प्रक्रिये येथील सामान्य रहिवासी मात्र दर नव्या विकासकासह नव्या घराकडे आशेनं डोळे लावून बसले आहेत हेच काय ते वास्तव!!!

Read More