Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईला बदलताना पाहिलेल्या 154 वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन पुलाचं नाव बदलणार; नवी ओळख असेल 'सिंदूर'

Mumbai News : कुठे आहे हा पूल? काय आहे त्या पुलाचा इतिहास? एकदा शहराच्या इतिहासात डोकावूनच पाहा... कुठून आलं नवं आणि जुनं नाव?   

मुंबईला बदलताना पाहिलेल्या 154 वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन पुलाचं नाव बदलणार; नवी ओळख असेल 'सिंदूर'

Mumbai News : मुंबई शहराचा जसजसा विकास होत गेला जसजसं या शहराचं रुपही बदलत गेलं. शहरात प्रवासाच्या अधिक सुखसोयी झाल्या. नव्या रस्त्यांपासून ते अगदी मेट्रो, मोनोच्याही सुविधा आल्या. अशा या हायटेक होऊ पाहणाऱ्या मुंबई शहराचा इतिहास मात्र आजही काही गोष्टी प्रकर्षानं उजेडात आणतो. मग ते ब्रिटीशकालीन बांधकाम असणारं दक्षिण मुंबईतील स्थापत्य असो किंवा मुंबई शहरात ब्रिटीशांच्या काळापासून असणारे आणि शहराच्या एका भागाला दुसऱ्या भागाशी जोडणारे पूल असो. 

मायानगरी मुंबईतील अशाच एका अतिशय जुन्या अशा पुलाला नुकतंच नवं रुप देण्यात आलं. या नव्या रुपासोबतच मुंईतील या ब्रिटीशकालीन पुलाला नवं नाव अर्थात नवी ओळखही देण्यात येणार आहे. ही ओळख असेल, 'सिंदूर'. 

दक्षिण मुंबईत आहे हा पूल... 

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काहीशाच अंतरावर हा पूर असून तो या भागाला पी.डीमेलो मार्गाशी जोडतो. अशा या पुलाचं मूळ नाव कर्नाक पूल. याच पुलाचं बांधकाम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटले असून आता त्याच्या उद्धाटनाचीही तारीख समोर आली आहे. 10 जुलै रोजी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार असून, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्करानं दिलेल्या उत्तराच्या कारवाईचं अर्थात Operation Sindoor चं नाव या पुलाला देण्यात येईल, ते म्हणजे 'सिंदूर'. 

हेसुद्धा वाचा : पगार नव्हे लॉटरी! Meta कडून या पठ्ठ्याला मिळालाय 845 कोटींची Salary, काही वर्षांपूर्वी करत होता 'हे' काम... 

काही काळापूर्वीच मध्य रेल्वे प्रशासनानं 154 वर्षांपूर्वीच्या या पुलाला धोकादायत घोषित केलं होतं. ज्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनानं 2022 मध्ये हा मूळ पूल हटवून पालिकेच्या वतीनं इथं नव्या पुलाचं बांधकाम करण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार या नव्या पुलाच्या बांधकामासाठी 60 कोटी रुपये इतका खर्च आला. दरम्यान मुळच्या कर्नाक पुलाची निक्मिरी 1868 मध्ये करण्यात आली होती. तत्कालीन 'बॉम्बे'चे गव्हर्नर जेम्स रिवेट कर्नाक यांच्या नावावरून या पुलाला कर्नाक पूल असं नाव देण्यात आलं होतं. 

Read More