Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Mumbai News : सावध व्हा...कबुतरांना खायला घातल्याने पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?

Mumbai Kabutar Khana: त्याने न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरांना खायला घातल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घ्या. अन्यथा तुम्हीदेखील अडचणीत येऊ शकता. 

Mumbai News : सावध व्हा...कबुतरांना खायला घातल्याने पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?


Mumbai Kabutar Khana : मुंबईतील माहिमच्या एल. जे रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याने अनोळखी चारचाकी चालकाविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 223, 270 आणि 271 अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पण नेमकं हे प्रकरण काय आहे, जाणून घ्या, अन्यथा तुम्ही पण अचडणीत येऊ शकता. उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की, मुंबईतील कबूतरखान्याना तोड आणि पक्ष्यांना खाद्य घातल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा. पण उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मुंबईत पक्ष्यांना खाद्य दिले जात आहे. यामुळे उच्च न्यायालयाने तीव्र नाराज व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

दादर कबुतरखाना तोडायला पालिकेचे अधिकारी आले पण...

मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखाना तोडण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री मुंबई महानगरपालिकेचे पथक आले असता स्थानिकांनी विरोध केला. या ठिकाणी मोठा जमाव जमल्यानंतर त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना तोडकाम करायला विरोध केला. पोलीस बंदोबस्तात कबुतरखान्याच्या भागातील पत्रे आणि इतर गोष्टी हटवण्यात आले असून आता तिथे फक्त कबुतरांसाठी एक पिंजरा बाकी आहे. 

कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचे धोकादायक समोर आला आहे. कबुतरांची विष्ठा आणि पिसे यामुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात पाहिला मिळत आहे. त्यासोबत बिल्डर्सने तक्रार केली आहे की, या कबुतरांच्या त्रासामुळे या भागातील घरं विकली जात नाहीत. त्यामुळे कबुतरखाना हटवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तरदुसरीकडे कबुतरखान्यांजवळ कबुतरांना कोणी खाणे किंवा दाणे घालणार नाही याची खात्री करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिकेला पहिलेच दिले आहेत.

मुंबईतील कबुतरखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे, मुंबई महानगरपालिकेने हे कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी, असे आदेश पावसाळी अधिवेशनाच्या वेळी सरकारने महापालिकेला देण्यात आले होते. त्यामुळे दादर कबुतरखान्यासह मुंबईतील कबुतरखाने बंद करा, अशी मागणी केली गेली. दुसरीकडे मनसेने या कबुतरखान्याच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असल्याने आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत. 

Read More