Mumbai's Coastal Road: सात वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने 27 कोटी रुपये खर्चून गोरेगाव पश्चिम येथील वीर सावरकर उड्डाणपूल आता जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. हा पूल तोडण्याचा महापालिकेचा विचार आहे. आता हा उड्डाणपूल मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या आड येत असल्याने हा उड्डाणपूल तो पाडणे आवश्यक असल्याचे मुंबई महापालिकेचे म्हणणे आहे.
गोरेगाव पश्चिम येथील एमटीएनएल फ्लायओव्हर हा पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट कनेक्ट करतो. हा पूल गोरेगाव आणि मलाड हा परिसर थेट द्रुतगती महामार्गाला जोडतो. त्यामुळं प्रवास 10 मिनिटांत शक्य होतो. नाहीतर या प्रवासासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागतो. जर हा पुल पाडला तर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
हा पूल मुंबई कोस्टल रोड फेज 2 आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या प्रस्तावित योजनेच्या आड येत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. जेव्हा या उड्डाणपुलाची संकल्पना मांडण्यात आली तेव्हा कोस्टल रोडचा दुसरा टप्पा आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड असा थेट संपर्क नियोजत नव्हता. कारण हे दोन्ही प्रकल्प स्वतंत्रपणे होणार होते. सुधारित योजनेचा एक भाग म्हणून, या दोन्ही कॉरिडॉरना जोडण्याचा प्रस्ताव आहे जेणेकरून वाहनचालकांना पूर्व-पश्चिम थेट प्रवेश मिळू शकेल. परिणामी, एमटीएनएल उड्डाणपुल प्रकल्पाच्या आड येत असल्याने आम्ही तो पाडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
एमटीएनएल पुलाला पर्याय म्हणून माइंडस्पेस आणि दिंडोशीदरम्यान जिथे सध्याचा उड्डाणपूल आहे. तिथे वाहनांना प्रवेश मिळेल असा डबल-डेकर उड्डाणपूल बांधण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुलाचा आराखडा तयार करण्यात आला आहे आणि अंतिम मंजुरीसाठी तो नागरी प्रशासनाकडे पाठवण्यात येत आहे.
प्रस्तावित कोस्टल रोडचा दुसरा टप्पा सहा वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये विभागला गेला आहे. पॅकेज अ मध्ये वर्सोवा आणि बांगुर नगर (गोरेगाव) दरम्यान 4.5 किमी आणि पॅकेज ब मध्ये बांगुर नगर आणि माइंडस्पेस (मालाड) दरम्यान 1.66 किमी अंतर असेल. पॅकेज क आणि ड मध्ये जुळे बोगदे - 3.6 किमी लांबीचे - मालाड येथील माइंडस्पेसला कांदिवलीतील चारकोपशी जोडणारे असतील.
हा पूल मुंबई कोस्टल रोड फेज 2 आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या प्रस्तावित योजनेच्या आड येत असल्याने तो पाडणे आवश्यक आहे.
हा उड्डाणपूल सात वर्षांपूर्वी, म्हणजेच 2018 मध्ये 27 कोटी रुपये खर्चून बांधला गेला.
हा पूल पश्चिम द्रुतगती महामार्गाला गोरेगाव आणि मलाड परिसराशी जोडतो आणि प्रवास 10 मिनिटांत शक्य करतो, ज्याला अन्यथा 45 मिनिटे लागतात.