BEST Bus Ticket Prices: सर्वसामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टचा प्रवास महागणार आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टने सरासरी तिकिटात आणि पासमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. याचा फटका बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना बसणार आहे. त्यामुळं महागाईने होरपळलेल्या नागरिकांना आता आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे.
काही दिवसांपूर्वी बेस्ट उपक्रमाने तिकीट दर वाढीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र बेस्ट दर वाढीच्या प्रस्तावाला अनेक संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. त्यात बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, बेस्टच्या महाव्यवस्थापक एस श्रीनिवास यांनी पदभार घेतल्यानंतर लगेचच बेस्टच्या भाडेवाढीचे सुतोवाच केले होते. तसा प्रस्तावही पालिका प्रशासनाकडे पाठवला होता. मात्र पालिका प्रशासनाने त्यावर काहीही निर्णय घेतला नव्हता. मात्र आता बेस्टने या भाडेवाढीला मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला तिकीट दरात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. पालिका प्रशासनाच्या मंजुरीनंतर वाहतूक विभाग आणि नगरविकास खात्याची मंजुरी तिकीट दरवाढ लागू करण्यात येणार आहे.
सध्या बेस्टला वार्षिक 845 कोटींचा महसूल मिळतो. भाडेवाढ जाल्यास वार्षिक उत्पन्न 1400 कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईकरांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसै मोजावे लागणार आहेत.
५ किमी अंतरासाठी ५ रुपयांवरुन १० रुपये
१० किमी अंतरासाठी १० रुपयांवरुन १५ रुपये
१५ किमी अंतरासाठी १५ रुपयांवरुन २० रुपये
२० किमी अंतरासाठी २० रुपयांवरुन ३० रुपये
५ किमी अंतरासाठी ६ रुपयांवरुन १२ रुपये
१० किमी अंतरासाठी १३ रुपयांवरुन २० रुपये
१५ किमी अंतरासाठी १९ रुपयांवरुन ३० रुपये
२० किमी अंतरासाठी २५ रुपयांवरुन ३५ रुपये
5 किमी अंतरासाठी 450 रुपयांवरुन 800 रुपये
10 किमी अंतरासाठी 1000 रुपयांवरुन 1250 रुपये
15 किमी अंतरासाठी 1650 रुपयांवरुन 1700 रुपये
20 किमी अंतरासाठी 2200 रुपयांवरुन 2600 रुपये
5 किमी अंतरासाठी 600 रुपयांवरुन 1100 रुपये
10 किमी अंतरासाठी 1400 रुपयांवरुन 1700 रुपये
15 किमी अंतरासाठी 2100 रुपयांवरुन 2300 रुपये
20 किमी अंतरासाठी 2700 रुपयांवरुन 3500 रुपये