Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईकरांसाठी लवकरच आणखी एक मेट्रो धावणार; बुधवारपासून मेट्रोची चाचणी सुरू होणार

Mumbai Metro News Update: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उभारत असलेल्या मेट्रो-२ बी मार्गिकेचे मंडाळे डेपो ते डायमंड गार्डनदरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. 

मुंबईकरांसाठी लवकरच आणखी एक मेट्रो धावणार; बुधवारपासून मेट्रोची चाचणी सुरू होणार

Mumbai Metro News Update: मुंबईकरांच्या ताफ्यात लवकरच आणखी मेट्रो येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उभारत असलेल्या मेट्रो-२ बी मार्गिकेचे मंडाळे डेपो ते डायमंड गार्डनदरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून (ता. १६) या टप्प्यात मेट्रोची चाचणी सुरू होणार आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी एमएमआरडीएकडून या मेट्रोची उभारणी करण्यात येत आहे. 

एमएमआरडीएकडून अंधेरी पश्चिम से मानखुर्द-मंडाळेदरम्यान तब्बल २३ किलोमीटरची मेट्रो मार्गिकेचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मंडाळे डेपो ते डायमंड गार्डन  चेंबूरदरम्यानच्या मेट्रो मार्गिकचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे एमएमआरडीए बुधवारपासून या टप्प्यातील पाच स्थानकांदरम्यान मेट्रोची चाचणी सुरू होणार आहे. त्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 

दुसरा टप्पा कधी सुरू होणार?

डिसेंबर2026 पर्यंत संपूर्ण मार्गिका सुरू होणार असून
आता एमएमआरडीएकडून मंडाळे ते चेंबूरदरम्यान मेट्रोच्या ट्रायल रन सुरू केल्या जाणार आहेत. त्यामध्ये वजनासह गाडीच्या चाचण्या, सिग्नलिंग यंत्रणा तसेच ट्रॅक्शन चाचण्यांचा समावेश असेल. या चाचण्या पूर्ण झाल्यावर आरडीएसओकडून मेट्रो गाड्यांची चाचणी केली जाईल. त्यानंतर कमिशन ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांना तपासणीसाठी बोलावले जाईल. ही तपासणी पूर्ण करून डिसेंबरअखेर ही मेट्रो मार्गिका सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.  डायमंड गार्डन ते डी. एन. नगर या उर्वरित मार्गावरील मेट्रो मार्गिकेची कामे अद्याप सुरू आहेत. ही कामे पूर्ण करून हा मार्ग डिसेंबर 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पहिल्या टप्प्यात असतील ही स्थानके

- मंडाळे डेपो
- मानखुर्द
- बीएसएनएल मेट्रो
- शिवाजी चौक
- डायमंड गार्डन

मेट्रो 2B चे कारशेड

मेट्रो 2 ब – मंडाले कारशेडचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर आता विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून 8 एप्रिलपासून कारशेडमधील विद्युत प्रवाहदेखील सुरू होणार आहे. मेट्रो 2B हा मार्ग हा पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो मार्ग -2अ (दहिसर ते डी एन नगर), मेट्रो मार्ग-3 (कुलाबा ते सिप्झ) आणि मेट्रो मार्ग -4 (वडाळा ते कासारवडवली) या महत्वाच्या मार्गांना जोडणारा आहे.

Read More