Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

BDD रहिवाशांना सप्टेंबर, डिसेंबरमध्ये मिळणार नव्या घराची चावी; वरळी, नायगाव की ना.म.जोशी मार्ग, पहिला नंबर कोणाचा?

BDD Chawl Redevelopment : यंदाचे गणपती, दिवाळी नव्या घरात.... बीडीडी रहिवाशांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी. आता नव्या घरात जाण्याचे दिवस जवळ आले....

BDD रहिवाशांना सप्टेंबर, डिसेंबरमध्ये मिळणार नव्या घराची चावी; वरळी, नायगाव की ना.म.जोशी मार्ग, पहिला नंबर कोणाचा?

BDD Chawl Redevelopment : मुंबईत (Mumbai News) मोक्याच्या ठिकाणी वस्ती असणाऱ्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरु झाला आणि पाहता पाहता मोठाल्या गगनचुंबी इमारतीसुद्धा उभ्या राहिल्या. आता याच इमारतींमध्ये तयार करण्यात आलेल्या मोठ्या आणि तितक्याच सोयीसुविधा असणाऱ्या या नव्या घराची चावी नेमकी केव्हा मिळणार याचीच उत्सुकता बीडीडी रहिवाशांना लागून राहिली होती आणि या उत्सुकतेला शिगेला पोहोचवणारी बातमी नुकतीच समोर आली आहे.

वरळी आणि नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम वेगाने सुरू असून, सप्टेंबरपर्यंत 2300 रहिवाशांना नव्या आणि हक्काच्या घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेत. वरळी बीडीडीतील 556 सदनिकांचं वाटप येत्या दोन आठवड्यांत करण्यात येणार असून, त्यामागोमाग उर्वरित 1419 सदनिकांचं वितरण सप्टेंबर महिन्यात केलं जाणार आहे. नायगाव बीडीडीतील 342 रहिवाशांना डिसेंबर महिन्यात त्यांच्या नव्या घराची चावी मिळणार आहे.

टप्प्याटप्प्यानं सुरुय पुनर्विकासाचं काम...

वरळी बीडीडी चाळीतील एकूण 9869 पुनर्वसन सदनिकांपैकी 3888 सदनिकांचं काम सध्या प्रगतीपथावर असून, यापैकी 556 सदनिकांचं हस्तांतरण पुढील दोन आठवड्यांत करण्यात येणार आहे. तसंच, 1419 सदनिकांचं हस्तांतरण सप्टेंबर 2025 मध्ये केलं जाणार असून उर्वरित 1642 सदनिकांचं हस्तांतरण ऑगस्ट 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे.

हेसुद्धा वाचा : पालिका निवडणुकीचा मुहूर्त आणखी पुढे? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट

इथं नायगाव बीडीडी चाळीतील 3344 सदनिकांपैकी 1938 सदनिकांचं काम प्रगतीपथावर असून, 864 सदनिकांचं हस्तांतरण सप्टेंबर 2025 मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पात 2560 सदनिका प्रस्तावित असून त्यातील 1241 सदनिकांचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. सुरु असून, त्यापैकी 342 सदनिकांचं हस्तांतरण डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळं ज्याप्रमाणं सदनिकांचं काम पूर्ण होईल त्याप्रमाणंच नव्या घराच्या चाव्या रहिवाशांना दिल्या जाणार आहेत हे स्पष्ट होत आहे.

Read More