Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

पश्चिम रेल्वे स्थानकात माथेफिरुकडून तरुणीचा विनयंभग, CCTV मध्ये घटना कैद

एकटी बघून त्याने तरुणीसोबत केलं अश्लील कृत्य, न घाबरता तीने लगावली थोबडीत 

पश्चिम रेल्वे स्थानकात माथेफिरुकडून तरुणीचा विनयंभग, CCTV मध्ये घटना कैद

प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपारा : मुंबईच्या रेल्वेस्थानकांवर रात्रीच्यावेळी महिला किती सुरक्षित आहेत, याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात एका माथेफिरुने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

22 फेब्रुवारीला रात्री 11 वाजता पीडित महिला घरी जाण्यासाठी नालासोपारा स्थानकात उतरली. स्थानकावर असलेल्या स्वयंचलित जिन्यावरुन जात असताना एकटी महिला बघून एका माथेफिरुने त्या महिलेसोबत अश्लिल कृत्य केलं. महिलेच्या हे लक्षात येताच तीने त्या माथेफिरुच्या थोबाडीत मारली. यावर संतापलेल्या माथेफिरुने महिलेवर हल्ला केला. 

महिलेनेही न घाबरता त्या माथेफिरुचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा करताच तो माथेफिरु तिथून पळून गेला. ही सर्व घटना CCTV त कैद झाली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन वसई लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत CCTV फुटेजच्या आधारे त्या विकृताचा शोध घेतला.

या माथेफिरुचं नाव बाबू निसार खान असं असून तो नालासोपारा मधल्या प्रगती नगरमध्ये राहतो. तो मूळचा राजस्थान इथला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. 

Read More