Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! शहरातला 'हा' महत्त्वाचा पूल 2 वर्षांसाठी बंद; ट्रॅफिक डायव्हर्जन समजून घ्या

Mumbai Traffic Updates: मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली असून आता हा ब्रिज थेट 2027 मध्ये सुरु होणार आहे.

मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! शहरातला 'हा' महत्त्वाचा पूल 2 वर्षांसाठी बंद; ट्रॅफिक डायव्हर्जन समजून घ्या

Mumbai Traffic Updates: मुंबईतील शिवडी-वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पूल 10 एप्रिलपासून दोन वर्षांसाठी बंद राहणार आहे. या पूलावरुन पुढील दोन वर्ष कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नाही. यासंदर्भातील सूचना मुंबई पोलिसांनी जारी केली आहे.  एल्फिन्स्टन पूल तात्पुरता बंद केल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. हा पूल दोन वर्षांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. मात्र हा पूल बंद ठेवला जात असल्याने पोलिसांकडून पर्यायी मार्ग कोणते असतील याबद्दलचा तपशील जारी करण्यात आला आहे. पाहूयात या पुलाला पर्यायी मार्ग कोणते सुचवण्यात आलेत.

- वाहने मडके बुवा चौक (परळ टर्मिनस जंक्शन) पासून उजवीकडे वळतील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने जातील. तसेच खोडादाद सर्कल (दादर टीटी जंक्शन) पासून डावीकडे टिळक ब्रिजमार्गे इच्छित स्थळी वाहनांना पोहचता येईल. 

- वाहने मडके बुवा चौकापासून (परळ टी.टी. जंक्शन) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडमार्गे थेट कृष्णा नगर जंक्शन, परळ वर्कशॉप, सुपारी बाग जंक्शन आणि भारत माता जंक्शन मार्गे पुढे जातील. तेथून, महादेव पालव रोडवर उजवीकडे वळून, करी रोड रेल्वे ब्रिज ओलांडून, आणि नंतर शिंगटे मास्टर चौकातून उजवीकडे वळून लोअर परळ ब्रिजवर पोहोचतील.

- खोडादाद सर्कल (दादर टीटी जंक्शन) पासून वाहने उजवीकडे वळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे टिळक ब्रिजकडे जातील.

- वाहने संत रोहिदास चौक (एल्फिन्स्टन जंक्शन) येथून सरळ जातील, वडाचा नाका जंक्शनपासून डावीकडे वळून लोअर परेल ब्रिजमार्गे पुढे जातील. शिंगटे मास्टर चौक येथे डावीकडे वळण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. डावीकडे वळून महादेव पालव रोड आणि करी रोड रेल्वे ब्रिज मार्गे गंतव्यस्थानावर पोहोचता येईल.

- वाहने संत रोहिदास चौक (एल्फिन्स्टन जंक्शन) पासून सरळ जातील, वडाचा नाका जंक्शन येथे डावीकडे वळतील. शिंगटे मास्टर चौक येथे पोहोचण्यासाठी याच मार्गाने वाहने लोअर परेल ब्रिजमार्गे पुढे जातील. त्यानंतर, वाहने महादेव पालव रोडवर डावीकडे वळतील आणि करी रोड रेल्वे ब्रिजमार्गे भारतमाता जंक्शनकडे जातील.

- महादेव पालव रोड (करी रोड रेल्वे ब्रिज) हा कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) पासून शिंगटे मास्टर चौकापर्यंत सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि विरुद्ध दिशेने दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत एक दिशा वाहतूक खुली राहील. दोन्ही दिशा रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुल्या राहतील.

Read More