Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Viral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट, सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल

Papa Ki Pari Viral Video : एक नाही दोन नाही तब्बल चार मुली एकाच स्कुटीवर तेही बिनाहेल्मेट भरधाव वेगाने जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांचा असा हा जीवघेणा स्टंट आणि वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचावर टीका होते आहे. 

Viral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट,  सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल

Mumbai Girls Scooty Video Viral : पापा की परींचा एक व्हिडीओ सोशल (Social media  video) मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. इंटरनेटवर पापा की परीचे अनेक व्हिडीओ (Papa Ki Pari Viral Video) पाहिला मिळतात. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात (Shocking video) व्ह्यूज मिळतात. कधी गाडीला ब्रेक न लागल्याने नालीत पडणं असो तर कधी रस्त्यावर बेभान गाडी चालवणं असो...पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्या एक नाही तर तब्बल चार पापा की परी दिसतं आहेत. (Trending Video)

जीवघेणा स्टंट !

या व्हिडीओमध्ये एका स्कूटीवरुन एक नाही दोन नाही तर तब्बल चार मुली प्रवास करत आहेत. खतरनाक म्हणजे या चौघींनीही हेल्मेटही (helmet) घातलेलं नाही. वाहतूक नियमांची पालमल्ली (Traffic rules) करणारा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचावर टीका करत आहेत. (Girls Video Viral)

या मुलींच्या स्कूटरचा वेगही एका बुलेटसारखा आहे. भरधाव वेगाने त्या गाडी चालवत आहेत एवढंच नाही तर जीवाची परवा न करता त्या वेगवान गाडीवर सेल्फी काढतानाही दिसत आहे. या तरुणींनी स्वत: सोबतच इतरांचेही जीव धोक्यात घातल आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांनी या मुलींचा हा व्हिडीओ काढला आहे. 


हा व्हिडीओ ट्विटरवर @RupaliVKSharma या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यांचावर कारवाईची मागणी करत आहेत. (mumbai Papa Ki Pari four girl on scooty without helmet selfies video viral on Social media  )

कुठला आहे हा व्हिडीओ 

हा धक्कादायक व्हिडीओ नवी मुंबईतील वाशी परिसरातील पाम बीच रोडवरील आहे. एका कारचालकाने हा व्हिडीओ काढला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (mumbai viral video)

Read More