Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

प्लास्टिकबंदीनंतर मुंबईकरांमध्ये असं वातावरणं

प्लास्टिक बंदीसाठी सरकारनं दंडात्मक कारवाई निश्चित केलीयं. 

प्लास्टिकबंदीनंतर मुंबईकरांमध्ये असं वातावरणं

मुंबई : प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर मुंबईत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून देतोय. मुंबईतील दादर मार्केट परिसरात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. सकाळी सकाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या हातात कापडी पिशव्या पाहायला मिळतात. नागरिकांनी या प्लास्टिक बंदीचं स्वागत केलंय. मात्र नेमक्या कुठल्या प्लास्टिक गोष्टींवर बंदी यावरुन काही जणांमध्ये संभ्रम असल्याचेही दिसतंय. या प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा मुंबईकरांनी व्यक्त केलीय.

आजपासून प्लास्टिकंबदी 

आजपासून राज्य सरकारनं मुंबईसह राज्यभर प्लास्टिक बंदी लागू केलीये. प्लास्टिक बंदीसाठी सरकारनं दंडात्मक कारवाई निश्चित केलीयं. त्यानुसार पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्यास पाच हजार रुपये, दुसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास दहा हजार रुपये आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपये आणि तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. कारवाईची नामुष्की टाळण्यसाठी सर्वांनी जवळ असलेलं प्लास्टिक पालिकेच्या संकलन केंद्रात जमा करावं असं आवाहन करण्यात आलंय.

३७ संकलन केंद्र 

प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं मुंबईतील विविध भागात ३७ संकलन केंद्र सुरु केलेत.. ओला आणि सुका कचरा संकलन केंद्रातही प्लास्टिक गोळा केलं जात आहे. दरम्यान शुक्रवारपर्यंत पालिकेच्या  संकलन केंद्रात १४५ मेट्रिक टन प्लास्टिक जमा झालंय. प्लास्टिक आढळल्यास कारवाई करण्यासाठी पालिकेनं २५० अधिकारी नेमले असून त्यांना दंडात्मक कारवाईचे आधिकार देण्यात आलेत. प्लास्टिक बंदिसाठी राज्यात पालिका क्षेत्रात आयुक्त तर ग्रामपंयाचत क्षेत्रात ग्रामसेवकांना कारवाईचे अधिकार दिलेत.

Read More