Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Mumbai Pollution : प्रदूषण उठवलं मुंबईकरांच्या जीवावर, मुंबईत 2 वर्षात 25 हजार जणांचा बळी

गेल्या काही दिवसात मुंबईचं हवामान कमालीचं प्रदुषित झालं आहे, याचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला बसतोय

Mumbai Pollution : प्रदूषण उठवलं मुंबईकरांच्या जीवावर, मुंबईत 2 वर्षात 25 हजार जणांचा बळी

देवेंद्र कोल्हटकर झी मीडिया, मुंबई : मुंबईकरांनो सावधान.. तुम्ही मुंबईत राहात असाल किंवा कामानिमित्तानं मुंबई प्रवास करत असाल तर सावधगिरी बाळगा. कारण अवघ्या 2 वर्षात वायूप्रदुषणामुळे 25 हजार मुंबईकरांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाल ग्रीन पीस संस्थेनं समोर आणलाय. 2020 आणि 2021 च्या आकडेवारीनुसार.

मुंबईतली हवा जीवघेणी 

श्वसनाच्या आजारासह इतर आजार बळावले

fallbacks

तीव्र ब्रोंकाईटीस, दमा, निमोनियामुळे मुंबईकर आपला जीव गमावतंयात

fallbacks

वाहनं, बांधकाम, मेट्रो यातून उडणारी धूळ यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होतंय

fallbacks

मुंबईत 2 वर्षात सुमारे 25 हजार नागरिकांचा वायू प्रदूषणानं मृत्यू झालाय

fallbacks

हवेची गुणवत्ता ढासळल्यामुळे फुफ्फुसाशी संबंधित आजारांच्या तक्रारी वाढल्यात. देशात वायूप्रदुषणामुळे सर्वाधिक मृत्यू हा कामगार आणि कारखान्यात काम करणा-या कर्मचा-यांचा होतो. वाढत्या वायू प्रदुषणाटा आरोग्यासह अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसतो. त्यामुळेच दिल्लीनंतर आता मुंबई ही प्रदूषणाच्या विळख्यात अडकू लागलीय. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालीय अन्यथा भविष्यातली परिस्थिती आणखी विदारक होण्याची शक्यता आहे..

Read More