Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

झगमग आणि तगमग... ये है आमची मुंबई!

मुंबई श्रीमंत झालीय... एका जागतिक अहवालात जगातल्या श्रीमंत शहरांमध्ये मुंबई १२ व्या स्थानावर आहे... तसं पाहता ही मुंबईसाठी चांगली बातमी... पण खरंच मुंबईकर श्रीमंत झालाय का? 

झगमग आणि तगमग... ये है आमची मुंबई!

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबई श्रीमंत झालीय... एका जागतिक अहवालात जगातल्या श्रीमंत शहरांमध्ये मुंबई १२ व्या स्थानावर आहे... तसं पाहता ही मुंबईसाठी चांगली बातमी... पण खरंच मुंबईकर श्रीमंत झालाय का? 

एकीकडे पॉश आणि चकाकणारी मुंबई आणि दुसरीकडे मुंबईतल्या गटारांच्या शेजारी वाढणाऱ्या झोपडपट्ट्या... प्रचंड विरोधाभासी ही मुंबईची दोन चित्रं... एकीकडे आमची मुंबई दिवसेंदिवस गगनचुंबी इमारतींची होतेय... आणि दुसरीकडे झोपडपट्ट्याही तेवढ्याच वेगानं पसरतायत... तरीही श्रीमंत शहरांच्या जागतिक यादीत आमची मुंबई १२ व्या स्थानावर आलीय.

fallbacks

देशाची आर्थिक राजधानी मुंबईची संपत्ती ६१ लाख कोटींपेक्षाही जास्त आहे. जगात सगळ्यात जास्त संपत्ती न्यूयॉर्क या शहराची आहे. न्यूयॉर्क शहर ११३ लाख कोटी संपत्तीसह न्यूयॉर्क पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ 

लंडन - १७३ अब्ज डॉलर्स

टोकियो - १६१ अब्ज डॉलर्स

सॅन फ्रॅन्सिस्को - १४७ अब्ज डॉलर्स

बीजिंग - १४१ अब्ज डॉलर्स

शांघाई - १२८ अब्ज डॉलर्स

लॉस एँजेलिस - ९० अब्ज डॉलर्स

हाँगकाँग - ८३ अब्ज डॉलर्स

सिडनी - ६४ अब्ज डॉलर्स

सिंगापूर - ६४ अब्ज डॉलर्स

शिकागो - ६३ अब्ज डॉलर्स

मुंबई - ६१ अब्ज डॉलर्स

अशी ही सगळी श्रीमंत शहरं आहेत... त्याचबरोबर सर्वाधिक अब्जाधीश वास्तव्याला असणाऱ्या शहरांच्या यादीत मुंबई पहिल्या दहा शहरांमध्ये आहे. मुंबईत तब्बल २८ जण अब्जाधीश आहेत... या एकूण संपत्तीत सरकारी निधीचा समावेश नाही. खासगी मालमत्ता, रोकड, शेअर्स आणि व्यवसायातली मालमत्ता यांचा यामध्ये समावेश आहे.

काही मूठभर लोकांच्या संपत्तीमुळे मुंबई जागतिक पातळीवर श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 

- ठराविक लोकांचं उत्पन्न वाढलं 

- घर आणि जमिनीच्या प्रचंड वाढलेल्या किंमती

- श्रीमंत लोकांकडे असलेले शेअर्स, दागिने आणि एकूण संपत्तीची बेरीज यामुळे मुंबई श्रीमंत झालीय.

मुंबई ही मुळातच मायानगरी... मुंबईत राहणाऱ्या मूठभर मुंबईकरांची माया वाढली म्हणून या अहवालात मुंबई श्रीमंत झालीय... पण आजही 'आहे रे' आणि 'नाही रे' यातली मुंबईतली दरीही मोठीच आहे.

Read More