Mumbai real estate: मुंबईत मोठी प्रॉपर्टी डील झाली. दक्षिण मुंबईत येणाऱ्या वरळी परिसरात एक फ्लॅट 1870000000 रुपयांना विकला गेला आहे. 15,000 चौरस फूटांचा हा फ्लॅट आहे. जाणून घेऊया हा फ्लॅट कोणी खरेदी केला. साठी किती रुपयांचा स्टॅम्प ड्युटी भरली.
वरळी हे सध्या दक्षिण मुंबईतील सर्वात प्राईन लोकेशन आहे. अनेक लक्झरियीस गृह प्रकल्प या परिसरात आहेत. रिअल इस्टेट कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सने येथे एका फ्लॅटची विक्री केली आहे. वरळी येथील सी फेस परिसरात एक आलिशान अपार्टमेंट
187.47कोटी रुपयांना विकला गेला आहे. या अपार्टमेंटचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 15000 चौरस फूट आहे. स्क्वेअर यार्ड्सच्या अहवालानुसार एसआर मेनन प्रॉपर्टीज एलएलपीसोबत हा करार करण्यात आला आहे. एसआर मेनन प्रॉपर्टीज एलएलपी ही एक भारतीय मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी) आहे. 2024 मध्ये ही स्थापन झाली. राधिका नारंग परसराम आणि सुधीर विजय मेनन हे दोघे या फर्मचे भागीदार आहेत .
जिथे हा फ्लॅट विक्री झाला तो प्रकल्प 1.5 एकरमध्ये पसरलेला आहे. येथे एकूण 29 लक्झरी निवासी युनिट्स आहेत. 5 बीएचके आणि 6 बीएचके असे हे फ्लॅट आहेत. आयजीआर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांनुसार, खरेदी केलेल्या अपार्टमेंटचे कार्पेट एरिया 1.381,09 चौरस मीटर आहे. या अपार्टमेंटमध्ये एकूण सात कार पार्किंगची जागा उपलब्ध आहेत. या व्यवहारात 11.25 कोटी रुपयांचे स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले.
मुंबईतील वरळीमध्ये गेल्या दोन वर्षात 4 हजार कोटींच्या आलिशान घरांची खरेदी झालीय. बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. यामध्ये ४०० कोटी रुपयांची बॉलीवूड कलाकारांकडून मालमत्ता खरेदी केलीय.