Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या मुंबईतील शिक्षिकेला कोर्टाकडून मोठा दिलासा

Mumbai Crime News: दक्षिण मुंबईमधील वेगवेगळ्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन ही शिक्षिका या मुलासोबत शरीरसंबंध ठेवायची असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयात घडलं काय जाणून घ्या...

फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या मुंबईतील शिक्षिकेला कोर्टाकडून मोठा दिलासा

Mumbai Crime News: दादरमधील एका नामांकित शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या शिक्षिकेला न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. या 40 वर्षीय महिला शिक्षिकेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने सोमवारी मंजूर केला. विशेष पॉक्सो न्यायालयाच्या न्यायमूर्ती सबिना मलिक यांनी हा जामीन मंजूर केला.

खोटे आरोप केल्याचा दावा

गेल्या महिन्यात अटक केलेल्या शिक्षिकेला पॉक्सो आणि भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) आणि बालन्याय कायद्याच्या संबंधित तरतुदीअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आपल्याला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले आहे. मुलाची आई आपल्या नात्याविरोधात होती. त्यामुळे तिने आपल्याविरोधात खोटे आरोप केल्याचा दावा शिक्षिकेने केला आहे.

डिजीटल माध्यमातून संपर्कात

मुलाबरोबर झालेला संवादही शिक्षिकेने न्यायालयात सादर केला. डिजीटल माध्यमातून आपण या विद्यार्थ्याच्या संपर्कात होतो असं शिक्षिकेने न्यायालयासमोर सांगितलं आहे. यासाठीचे पुरावे म्हणून शिक्षिकेनं काही स्क्रीनशॉट्स आणि संवादाचा तपशील सादर केला.

पालकांना होती कल्पना

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शिक्षिकेने सदर नात्याची कल्पना या विद्यार्थ्याच्या पालकांना होती असा दावा न्यायालयासमोर करण्यात आला आहे. शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या पालकांना त्याच्या आणि आपल्यात असलेल्या नात्याची माहिती होती. आपण विवाहित असल्याने ते या नात्याच्या विरोधात होते, असंही या शिक्षिकेने कोर्टासमोर म्हटलं आहे. 

पहिल्यांदा जानेवारी 2024 मध्ये लैंगिक संबंध

विद्यार्थ्याला शिक्षिकेबद्दल असलेल्या प्रेमाची भावना होती आणि ही बाब जाणूनबुजून लपविण्यात आली आहे, असे शिक्षिकेने केलेल्या अर्जात म्हटले होते. डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासंबंधी घेतलेल्या बैठकांमध्ये सहभागी झालेल्या 16 वर्षाच्या विद्यार्थ्याकडे आरोपी आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये पहिल्यांदा त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. आरोपी या मुलाला मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जायची. तिथे ती त्याचे लैंगिक शोषण करायची. आरोपीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आमच्यामध्ये जे काही घडलं ते संमतीनेच झाल्याचा दावा या महिला शिक्षिकेने केला आहे.

ग्रिटींग कार्ड्सपासून अनेक गोष्टी कोर्टासमोर ठेवल्या

महिला शिक्षिकेने पीडित मुलाच्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख करुन घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र आमच्यामधील संबंध हे परस्पर संमतीने ठेवण्यात आले होते असं या शिक्षिकेने म्हटलं आहे. हा मुलगा आपल्याला प्रेमाने कोणत्या नावाने हाक मारायचा इथपासून ते त्याने पाठवलेल्या ग्रिटींग कार्ड्सपर्यंत अनेक पुरावे आपला दावा योग्य असल्याचं सांगण्यासाठी या शिक्षिकेने सादर केले आहेत. याच सर्वांच्या आधारे या शिक्षिकेला आता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Read More