Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

ट्रेनमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय; नवीन लोकलमध्ये...

Mumbai Local Train News: मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या लोकलमधून 8 प्रवासी पडल्याची माहिती समोर येत आहे. या 8 ही प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ट्रेनमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय; नवीन लोकलमध्ये...

Mumbai Local Train News: मुंबई उपनगरातील मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघातात 5 जणांनी जीव गमावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकलच्या दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलमधील प्रवाशांचा धक्का लागून 10 ते 11 प्रवासी लोकलमधून पडले. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 

जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, असे अपघात पुन्हा घडू नयेत यासाठी नवीन येणाऱ्या गाड्या या स्वयंचलित ओअर क्लोजर सिस्टिमसोबत येणार आहेत. ज्या 238 नवीन एसी लोकल  येणार आहेत त्या मध्ये स्वयंचलित डोअर फिटमेंटने येणार आहेत. तसंच, ICFच्या माध्यमातून सध्या ज्या लोकल धावत आहेत. या रेट्रो फिटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचे सिस्टम लावण्यात येणार आहे, असा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती स्वप्निल निला यांनी दिली आहे. 

दरम्यान, लोकलमधील गर्दी कशी कमी होणार याबाबतही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. मध्य रेल्वेने कल्याणपासून कसारापर्यंत तिसऱ्या चौथ्या लाइनचे काम सुरू आहे. त्यासोबतच कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसरी-चौथी लाइन आहे त्याचेही काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर दादरपासून किंवा दिव्यापासून सीएसएमटीपर्यंत नव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. हे काम कुर्ल्यापर्यंत पूर्ण झाले आहे. कुर्ल्याचे पुढील कामासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. तसंच, 15 कोचच्या लोकलचे कामदेखील सुरू आहे. त्या दृष्टीकोनातून सगळे प्रयत्न सुरू आहे. पायाभूत सुविधा अपग्रेड केल्यानंतर लोकलची संख्या वाढवण्यात येईल तसंच, सध्या 12 कोचच्या लोकल धावत आहेत. त्या वाढवून 15 कोचच्या करता येतील, असंही जनसंपर्क अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

अपघात कसा घडला? 

मुंब्रा रेल्वे स्थानकातून दोन्ही रेल्वे जात होत असताना लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा या समोरून येणाऱ्या प्रवाशांना लागल्याने ही घटना घडली असल्याची माहिती मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. 

Read More