Mumbai University fake Facebook page: मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एका बनावट फेसबुक पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात सायबर क्राइम विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बनावट फेसबुक पेज https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/ या लिंकवर आढळून आले आहे. त्यावर इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाकण्यास सांगितले जाते. ही माहिती भरल्यानंतर यूजर्सना https://www.markmonitor.com/online-com/ या संशयास्पद वेबसाईटवर वळवले जाते.
या प्रकारातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि अधिकृत वेबसाईट व माध्यमांद्वारेच माहितीची खात्री करूनच पुढील पाऊल उचलण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठ किंवा त्याच्या वतीने कुठल्याही अशा माध्यमातून प्रवेश प्रकिया राबवली जात नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी अशा बनावट पेजपासून सावध राहावे आणि संशयास्पद माहिती त्वरित संबंधित यंत्रणांकडे कळविण्यात यावी असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे अधिकृत समाज माध्यम खाती खालील प्रमाणे:
फेसबुक ://www.facebook.com/share/16NYoF47Qr/?mibextid=wwXIfr
इंस्टाग्राम : @uni_mumbai https://www.instagram.com/invites/contact/?igsh=1waqe9cui2ljn&utm_content=frrdwsd
एक्स: https://x.com/uni_mumbai?s=21&t=4_dHhl9cp9NER8yj3DA9tQ
यूट्यूब: https://youtube.com/@universityofmumbai_uom?si=Cn8v_VbmdtbuebSF
व्हॉट्सअप चॅनेल: https://whatsapp.com/channel/0029Vb1yiOPK0IBi6rHdBw41