Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

कुर्ला रेल्वे स्टेशनवर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न (व्हिडिओ)

कौटुंबिक कलहातून केले कृत्य

कुर्ला रेल्वे स्टेशनवर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न (व्हिडिओ)

मुंबई: कुर्ला रेल्वे स्टेशनवर सोमवारी (३१ जुलै) दुपारी दीडच्या सुमारास एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. ५४ वर्षांचे नरेंद्र दामाजी कोटेकर आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उतरले मात्र प्रसंगावधान राखत तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफ जवान आणि काही प्रवाशांच्या मदतीने या नरेंद्र कोटेकरांना आत्महत्या करण्यापासून रोखलं आणि कोटेकरांचे प्राण वाचले. घरगुती कारणांमुळे नरेंद्र यांनी आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचं सांगितल. यावेळी रेल्वे पोलिसांनी कोटेकरांच्या कुटुंबियांना बोलावून नरेंद्र यांना त्यांच्या स्वाधीन केलं.

Read More