Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

...

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई: वारंवार पाठपुरावा करूनही सरकार आणि प्रशासनाकडून अपेक्षीत प्रतिसाद येत नसल्याने एका तरूणाने आज (११ जून) मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. धुळे महापालिकेशी संबंधीत हे नोकरी प्रकरण असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, प्रसंगावधान राखत पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेतले आणि पुढचा अनर्थ टळला. मात्र, हा तरूण कोण आहे. नेमका तो कोणत्या नोकरीसाठी प्रयत्नशील होता. तसेच, मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन आत्मदहन करण्यापाठीमागचे नेमके कारण काय? याबाबत अद्याप माहिती पुढे आली नाही. पोलीस त्याबाबत अधिक तपास करत आहेत. रॉकेल अंगावर ओतून घेत या तरूणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Read More