Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अगदी 8 ते 12 रुपयांत मिळणार बर्गर आणि बरच काही, पण.....

मुंबई एक असं शहर जिथे खवय्यांची चंगळ असते. 

अगदी 8 ते 12 रुपयांत मिळणार बर्गर आणि बरच काही, पण.....

मुंबई  : मुंबई एक असं शहर जिथे खवय्यांची चंगळ असते. 

मुंबईतील अशाच एका ठिकाणी तुम्हाला चक्क 8 ते 12 रुपयांत बर्गर मिळणार आहे. आश्चर्यचकित झालात ना मुंबईचा वडापाव जिथे आता 12 ते 15 रुपयांना मिळतोय तिथे बर्गर चक्क 12 रुपयांपर्यंत. हे कसं शक्य झालं. ही ऑफर आहे द अमेरिकन जॉईंटने ठाण्यातील त्यांच्या आऊट लेटच्या प्रमोशनसाठी एक नवा फंडा सुरू केला आहे. ''पे द डेट'' या नावाची ही कन्सेप्ट आहे. या ठिकाणी तुम्ही सूप, सलाड, बर्गर, आयस्क्रिम यासारख्या गोष्टी 8 ते 12 रुपयांत खावू शकता. पण 

यासाठी त्यांनी काही अटी दिल्या आहेत. 

1)  पे द डेट ही ऑफर ग्रँड लंच मेनूवर उपलब्ध आहे. प्रत्येक टेबलवर फक्त एख ग्रँड लंच मेून ऑर्डर करू शकता. ही ऑर्डर 8 ते 12 रुपयांपर्यंत असणार आहे. हा दर तारखेवरून ठरवण्यात आला आहे. जर तुम्ही आज या ठिकाणी गेलात तर तारखेनुसार 10 जानेवारीप्रमाणे तुम्हाला 10 रुपयाला त्यांचा ग्रँड लंच मेनू उपलब्ध होणार आहे. 

2)पे द डेट ही ऑफर इतर कोणत्याही ऑफरसोबत जोडू शकत नाही. ही ऑफर फक्त दिवसांतून एकदाच मिळणार आहे. 

3) पे द डेटमध्ये ऑर्डर केल्यावर तुम्हाला रेग्युलर प्राईजचा एक मेनू ऑर्डर करणं अनिवार्य आहे. 

या अटी नियमानुसार तुम्हाला ग्रँड लंच मेून जरी 8 ते 12  रुपयाला उपलब्ध असला तरीही त्यासोबत रेग्युलर जी ऑर्डर करायची आहे. त्याचे दर मात्र वेगळे असणार आहेत. त्यामुळे या सर्व अटी वाचूनच जा. 

fallbacks

द अमेरिकन जॉईंटच्या ठाण्यातील पाचपाखाडी आऊट लेटला फक्त ही ऑफर आहे. तसेच हे जॉईंट दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत सुरू असणार आहे. आणि ही ऑफर या शुक्रवारपर्यंत मर्यादित असणार आहे. नव्या आऊटलेटच्या प्रमोशनसाठी हा नवा फंडा वापरण्यात आला आहे. 

Read More