Elphinstone Bridge: मुंबईतील एलफिन्स्टन पूल येत्या 15 एप्रिलपासून बंद होणार आहे. मुंबई वाहतूक विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रभादेवी रेल्वे स्थानकातील पूल बंद केल्यानंतर सायन, माटुंग्याकडून येणारी आणि वरळी, लोअर परेल, महालक्ष्मीकडे जाणारी वाहतूक दादरच्या टिळक पुलावरुन वळवली जाणार आहे. त्यामुळं दादर पश्चिमेला मोठी वाहतूककोंडी होण्याची चिन्हे आहेत.
अटल सेतूला थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी हा पूल पाडण्यात येणार आहे. पाडकामानंतर 15 एप्रिलनंतर हा पूल बंद असणार आहे. 15 तारखेपर्यंत मुंबई महापालिकेची अंतर्गत पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाही तर पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. मुंबईत प्रथमच कोणताही पूल पाडण्याआधी मुंबईतरांकडून सूचना-हरकती मागवल्या जाण्याचा प्रयोग केला जातोय.
प्रभादेवीचा पूल बंद झाल्यानंतर दादर येथील टिळक ब्रीज आणि करीरोड येथील पुलाचा समावेश आहे. मात्र प्रभादेवी पुलाच्या वाहतुकीचा भार या दोन्ही पुलांवर पडेल. त्यामुळं वाहतूक कोंडी वाढून 30 मिनिटांचा प्रवास वाढणार आहे. करीरोडच्या तुलनेत दादरला त्याचा अधिक फटका बसणार आहे. लोअर परळ एसटी डेपोमधून सर्व बस एल्फिन्स्टन पूलावरुन दादरला येतात. मात्र आता एसटीला वळसा घालून दादरला जावे लागणार आहे.
प्रभादेवीचा पूल पाडल्यानंतर दादर पश्चिम, एन. सी केळकर मार्ग, एसके बोले मार्ग, भवानी शंकर रोड, गोखले रोड, रानडे रोड, गोखले रोड, दादर पूर्वयेथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.
प्रभादेवी पुलाची वैशिष्ट्यै
मुंबईतला सर्वात जूना ब्रिटीशकालीन पूल असून 125 वर्षे जूनं दगडी बांधकाम आहे. 1913 साली हा पूल बांधण्यात आला असून तो परळ ते प्रभादेवीला जोडणारा पूल आहे. इथे
जुना ब्रिज तोडून डबल डेकर ब्रिजची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार आहे.
- वाहतूक परळ टी.टी. जंक्शन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडमार्गे थेट कृष्णा नगर जंक्शन, परळ वर्कशॉप, भारत माता जंक्शन मार्गे पुढे जातील.
- खोदादाद सर्कल पासून वाहने उजवीकडे वळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे टिळक ब्रिजकडे जातील.
- करी रोड रेल्वे पूलावर दिवसभरासाठी एकाच दिशेनं वाहतूक होईल भारत माता जंक्शन पासून शिंगटे मास्टर चौकापर्यंत सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि विरुद्ध दिशेने दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत एक दिशा वाहतूक खुली राहील.
- रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत दोन्ही दिशा वाहतुकीसाठी खुल्या राहणार आहेत.