Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

एल्फीन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव बदललं

स्थानकाच्या नावांचे फलक नव्यानं पहायला मिळणार

एल्फीन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव बदललं

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील एल्फीन्स्टन रेल्वे स्थानकाचे मध्यरात्री प्रभादेवी असं नामांतर करण्यात आले. केंद्र सरकारनं दोन स्थानकांच्या नावात बदल करण्याची अधिसूचनेप्रमाणे पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी असं ठेवण्यात आलं. प्रभादेवी स्टेशनचं नवीन कोड इनिशिअल पीबीएचडी देण्यात आला आहे.

मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी अखेर मान्य झाली आहे. मध्यरात्री एल्फिन्स्टन रोड स्थानकावर प्रभादेवी स्थानकांच्या नावांचे फलक नव्यानं पहायला मिळणार आहेत.

Read More