Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो सप्टेंबरपर्यंत सेवेत? पहिल्या टप्प्यात अशी असतील 10 स्थानके

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. बीकेसी ते आरे दरम्यानच्या दहा स्थानकांचे काम पूर्ण झाले  आहे.   

मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो सप्टेंबरपर्यंत सेवेत? पहिल्या टप्प्यात अशी असतील 10 स्थानके

Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास सुकर आणि आरामदायी होण्यासाठी प्रशासन संपूर्ण मुंबई महानगर परिसरात मेट्रोचे जाळे पसरवत आहे. मुंबई मेट्रो 3 या मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यानच्या दहा स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं मेट्रो 3ची सेवा सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून 33.5 किमी लांबीचा भुयारी मार्गिका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मार्गिकेवर एकूण 27 स्थानके आहेत. मात्र पहिल्या टप्प्यात फक्त 10 स्थानकातूनच मेट्रो धावणार आहे. बीकेसी ते आरेदरम्यानची 10 स्थानके पहिल्या टप्प्यात असणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातील ही स्थानके 22 ते 28 मीटर जमिनीखाली असून मुंबई विमानतळाजवळीलल सहार रोड, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 ही स्थानके सर्वात जास्त खोलीवर आहेत. 

एमएमआरसीने आरडीएसओ पखकाकडून या मेट्रो मार्गिकेची तपासणी झाली आहे. मेट्रोच्या ट्रायल रनदेखील घेतल्या आहेत. संपूर्ण 33 किमीचा भुयारी मार्ग पुढच्या वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. तर पहिला टप्पा पुढील महिन्यात खुला केला जाऊ शकतो. अशी शक्यता आहे. मेट्रो मार्गिकेवरील टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 स्थानकाची फिनिशिंगची कामे सध्या सुरू आहेत. लवकरच स्थानकांचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. एमएमआरसीने तशा हालचाली सुरू केल्या आहेत. 

मुंबई मेट्रो 3 मार्गावर अशी आहेत स्थानके

कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.

पहिल्या टप्प्यातील 10 स्थानके कोणती?

आरे, सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका, आंतराराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, सहार रोड, विमानतळ टर्मिनल 1, सांताक्रुझ, विद्यानगरी, बीकेसी

Read More