Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल', सुनील शुक्लाची मुक्ताफळं

North Indian Mumbais mayor:  मुंबईत रोजगारासाठी आलेल्या उत्तर भारतीयांना आता त्यांचा महापौर हवाय.

'मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल', सुनील शुक्लाची मुक्ताफळं

North Indian Mumbais mayor: मुंबईतील मराठी माणसाला संताप आणणारी बातमी समोर येतेय. मुंबईत रोजगारासाठी आलेल्या उत्तर भारतीयांना आता त्यांचा महापौर हवाय. परप्रांतीयांचा मुंबईच्या महापौरपदावर डोळा असल्याचे पाहायला मिळतंय.उत्तर भारतीय विकास सेनेला सत्तेची स्वप्नं पडू लागली आहेत. 1 कोटी उत्तर भारतीय मुंबईचा महापौर ठरवतील, असे विधान उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लाने केलंय. मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल, अशी मुक्ताफळ सुनील शुक्लाने उधळली आहेत. 

संपूर्ण मुंबईची लोकसंख्या 2 कोटी 10 लाख आहे. यात 1 कोटी नागरिक मराठी आहेत, 1 कोटी नागरिक उत्तर भारतीय आहेत. तर इतर राज्यातील 10 लाख लोक आहेत. मुंबईतील मराठी माणूस 5 पक्षात विखुरला गेलाय. त्यामुळे मुंबईत उत्तर भारतीयांची सत्ता येऊ शकते. येथे एक उत्तर भारतीय महापौर बसू शकतो, असे सुनील शुक्लाने म्हटलंय.

Read More