Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

पालिका आयुक्तांवर २४ तासातच स्वत:चा आदेश मागे घेण्याची वेळ

चार सुरक्षा रक्षक तडकाफडकी निलंबित करण्य़ात आले होते.

पालिका आयुक्तांवर २४ तासातच स्वत:चा आदेश मागे घेण्याची वेळ

मुंबई : महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्य़ावर स्वतःचेच आदेश मागे घेण्याची वेळ आलीय. आयुक्तांची गाडी वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे चार सुरक्षा रक्षक तडकाफडकी निलंबित करण्य़ात आले होते. ३ पुरुष आणि १ महिला सुरक्षारक्षकावर कारवाई करण्यात आलीय.

२४ तासात निलंबन मागे 

चार दिवसांपूर्वी या सुरक्षारक्षकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर वाहतूक कोंडी हटवली नाही, असा ठपका ठेवत, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. पण २४ तास होण्यापूर्वीच सुरक्षारक्षकांचं निलंबन मागे घेण्यात आलं. या सगळ्या प्रकरणी झालेल्या वादानंतर सुरक्षारक्षकांचं निलंबन मागे घेण्यात आलंय, त्यामुळे आयुक्तच तोंडघशी पडल्याचं समोर आलंय.

Read More