Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'मला मुख्यमंत्री करा, तुम्हाला हवा तो निर्णय देईन...' भेटीगाठी आणि ऑफर... राजकारणातला आणखी एक गौप्यस्फोट

Political News : राज्याच्या राजकारणात नेमकं काय, कुठे आणि कधी घडलं? मुख्यमंत्री पदावर डोळा... ऑफर देत म्हटलं तरी काय? पाहा मोठी बातमी   

'मला मुख्यमंत्री करा, तुम्हाला हवा तो निर्णय देईन...' भेटीगाठी आणि ऑफर... राजकारणातला आणखी एक गौप्यस्फोट

Political News : मागील पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या, सरकार पडलं, नवं सरकार उभं राहिलं, राज्याला नवे मुख्यमंत्री अन् नवे उपमुख्यमंत्री मिळाले. तेसुद्धा एक नव्हे, दोन. सातत्यानं राजकीय उलथापालथी होणाऱ्या या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या दाव्यासंदर्भात आता आणखी एक गौप्यस्फोट झाला असून, इथं आणखी एक नाव चर्चेत आलं आहे. 

हे नाव आहे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ. आपणही मुख्यमंत्री पदासाठी दावा केला होता असा गौप्यस्फोट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. '(Shivsena) शिवसेनेतील बंडानंतर विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावणीवेळी (NCP Sharad Pawar Party) आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलो होतो. आता या सरकारचे काही खरं नाही. त्यामुळे तुम्हाला हवा तसा निर्णय देईन. पण, मला मुख्यमंत्री करा, अशी ऑफर जयंत पाटील यांना दिली होतीट असा दावा नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि त्यांचे दावे, ऑफर याचीच चर्चा सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या सांगतेसह पावसाची राज्यात पुन्हा एन्ट्री; कोणत्या भागांमध्ये कोसळधार? 

दरम्यान, जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळ या आपल्या मुलाला आपणच पाठवलं असा धक्कादायक खुलासाही झिरवाळांनी केला. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली होती. यामुळे गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, ज्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण देत नव्या राजकीय चर्चांना आणि शक्यतांना वाव दिला. 

Read More