Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'नसिरुद्दीन शाहांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या', BJP आक्रमक; म्हणाले, 'कैलास पर्वत हिंदूंची...'

Naseeruddin Shah Diljit Dosanjh Comment: नसिरुद्दीन शाह यांनी केलेली ती वादग्रस्त पोस्ट हटवली असली तरी त्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं असून यात आता भाजपाने उडी घेतली आहे.

'नसिरुद्दीन शाहांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या', BJP आक्रमक; म्हणाले, 'कैलास पर्वत हिंदूंची...'

Naseeruddin Shah Diljit Dosanjh Comment: ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी लोकप्रिय अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझचा 'सरदार जी 3' या चित्रपटाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. शाह यांनी केलेल्या विधानावरुन आता भारतीय जनता पार्टीनं आक्रमक भूमिका घेतली आहे. नसिरुद्दीन शाह यांनी हिंदूंच्या भावना दुखावणारं विधान केलं असून त्यांनी माफी मागायला हवी असं भाजपाचे आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...

नेमका वाद काय?

दिलजीतच्या नव्या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर मुख्य भूमिकेत असल्याने या चित्रपटाला भारतातून विरोध होत आहे. पहगलाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मनोरंजनसृष्टीने पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार टाकलेलं असताना दिलजीतच्या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री झळकल्याने या चित्रपटाला विरोध होत आहे. मात्र या विरोधावरुन नसिरुद्दीन शाह यांनी सोमवारी फेसबुकवरुन संताप व्यक्त करत दिलजीतला पाठिंबा दर्शवला.

नसिरुद्दीन शाह काय म्हणाले?

'मी दिलजीतच्या पाठीशी आहे. जुमला पार्टीच्या या घाणेरड्या ट्रिक्स डिपार्टमेंट त्याच्यावर कसा हल्ला करता येईल त्याची संधी शोधत आहेत. त्यांना वाटतं की या प्रकरणाच्या माध्यमातून त्यांना ही आयती संधी मिळाली आहे. चित्रपटाच्या कास्टिंगसाठी तो (दिलजीत) जबाबदार नसून दिग्दर्शक जबाबदार आहे. मात्र चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे हे कोणाला ठाऊक नाही. दुसरीकडे दिलजीतला संपूर्ण जग ओळखतं. दिलजीतच्या डोक्यात अशा कोणत्याही प्रकारचं विष नाही. त्यामुळेच त्यांनी कास्टिंगसाठी दिलजीतला होकार दिला असेल. हे गुंड भारत आणि पाकिस्तानी लोकांमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी संपवण्याचा प्रयत्न करत आहेत,' अस शाह यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. 

'तिथे (पाकिस्तानमध्ये) माझे काही जवळचे नातेवाईक आणि काही चांगले मित्र आहेत. जेव्हा केव्हा माझी इच्छा होते, तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी जातो. तसेच त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यापासून मला कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळेच यासाठी जे लोक मला पाकिस्तानला जा म्हणतील, त्यांच्यासाठी माझं उत्तर, 'कैलासला जा' असं असेल,' असा खोचक टोलाही या पोस्टमधून शाह यांनी लगावला. ही पोस्ट आता फेसबुकवर दिसत नसली तरी त्याचा स्क्रीनशॉट चर्चेत आहे.

fallbacks

कैलासला पाकिस्तानशी जोडणं चुकीचं

शाह यांच्या या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच आमदार राम कदम यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. "शाह यांचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखवणारे आहे. हिंदू धर्म आणि भावना त्यांनी दुखवाल्या आहेत.  त्यांनी माफी मागायलाच पाहिजे," असं राम कदम म्हणालेत. तसेच, "त्यांच्या कलेचा आम्ही आदर करतो. कैलास हिंदूंची तीर्थभूमी आहे. त्याला पाकिस्तानशी जोडणं चुकीचं आहे," असंही राम कदम म्हणालेत. 

पाकिस्तानचा आणि तुमचा काय संबंध?

"पाकिस्तानचा आणि तुमचा काय संबंध? इतकंच असेल तर तुम्ही तिकडे जा," असंही राम कदम शाह यांच्यावर टीका करताना म्हणाले. विधानसभेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना कदम यांनी, "कोट्यावधी हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य त्यांनी केले आहे, त्यांनी माफी मागितलीच पाहिजे," असंही म्हटलंय.

Read More