Navi Mumbai Crime News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह, नवी मुंबई, ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ होत होती. या टोळीला जेरबंद करण्यास अखेर पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी या चड्डी-बनियन टोळीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी टँकरचे पाणी पाजून व सापळा रचत या दोघांना अटक केली आहे.
या चड्डी-बनियन टोळीने परिसरात दहशत माजवली होती. चड्डी आणि बनियान घालून येणारे हे गुन्हेगार कुठेन येतात आणि जातात याचा शोध पोलिसांना लागत नव्हता. पोलिसांनी या चोरांची अधिक माहिती काढली. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर या टोळीने भाड्याने घर घेतले होते. पण जेव्हा हे गुन्हेगार चोरी करण्यासाठी बाहेर पडायचे तेव्हा मात्र त्या ठिकाणी थेट न जाता दुसऱ्या शहरातून जायचे.
त्यामुळं पोलिसांना हे गुन्हेगार शोधणे एक आव्हान होते. मात्र पोलिसांना एक धागा सापडला. या टोळीतील प्रमुखाचा एक भाऊ येरवडा जेलमध्ये होता. त्यावरुन पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची माहिती काढून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा पोलिसांना एक सुगावा लागला. तो म्हणजे संशयित आरोपी दिव्यातील साबे गावातील चाळीत राहत असल्याचे पोलिसांच्या हाती लागले.
संशयित आरोपीची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी एक शक्कल लढवली. पोलिस अधिकारी, कर्मचारी पाण्याच्या टॅकरमधून चाळीत पाणी वाटायला जायचे. ज्या चाळीत गुन्हेगार होते, त्या चाळीला टँकरने पाणीपुरवठा होत होता. त्या टँकरचालकाला विश्वासात घेऊन पोलिस त्याच्यासोबत कामगार बनून घरोघरी पाणी वाटत फिरले होते. पोलिसांना खात्री पडल्यानंतर 25-30 जणांच्या पथकाने चाळीला घेराव घालून संशयित घरातून दोघांच्या मुसक्या आवळल्या. शहाजी पवार आणि अंकुश पवार अशी दोघांची नावं असून ते मुळचे धाराशिव जिल्ह्यातील कळंबचे रहिवाशी आहेत. पोलिसांनी यांना ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.
वॉकी टॉकी वापरून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक
पिंपरी चिंचवड मधल्या शहरातील प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात उद्योजकाच्या घरात घुसत त्याचे हातपाय बांधून पिस्तूलाचा धाक दाखवत तब्बल 6.15 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आलंय. राजस्थानपर्यंत बाराशे किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी या दरोड्यातील आरोपीला अटक केली